13 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 मे 2022)
‘जी-7’ची परराष्ट्रमंत्रीस्तरीय परिषद जर्मनी येथे सुरू :
उत्तर जर्मनीत गुरुवारपासून जी-7 राष्ट्रांची परराष्ट्रमंत्री स्तरीय परिषद सुरू झाली आहे. ती 14 मेपर्यंत चालणार आहे.
युक्रेनमधील युद्ध, ऊर्जा, अन्नसुरक्षा, चीनशी संबंध आणि पर्यावरण बदल या मुद्दय़ांवर या तीन दिवसीय परिषदेत विचारविनिमय होणार आहे.
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि रशियाचे आगामी लक्ष्य असल्याची भीती असलेल्या मोल्दोव्हा या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांना या परिषदेस अभ्यागत म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
20 राष्ट्रांच्या समूहाचे यंदा अध्यक्षपद भूषवत असलेल्या इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्रीही या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.
युक्रेन युद्धाचे जागतिक परिणाम या विषयावरील चर्चेत ते सहभागी होणार आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारपासून सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या मदरशा शिक्षण मंडळाचे कुलसचिव एस. एन. पांडे यांनी तसे आदेश 9 मे रोजीच जिल्हा अल्पसंख्य कल्याण अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.
तर 24 मार्च रोजी शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
रमझानच्या सुटय़ानंतर 12 मे रोजी सर्व मदरशांचे नियमित वर्ग सुरू झाले.
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी विक्रमसिंघे नियुक्त :
श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या मुद्दय़ावर सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे यापूर्वीचे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते रानिल विक्रमसिंघे यांना गुरुवारी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली.
तर यापूर्वी चार वेळा देशाचे पंतप्रधानपद म्हणून काम पाहिलेले विक्रमसिंघे यांना तत्कालीन अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये पदावरून हटवले होते.
तथापि, त्यानंतर दोनच महिन्यांनी सिरिसेना यांना त्या पदावर पुनस्र्थापित केले.
राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त :
राजीव कुमार यांची गुरुवारी देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे 14 मे रोजी निवृत्त झाल्यानंतर, 15 मे रोजी राजीव कुमार हे पदभार स्वीकारतील.
सुशील चंद्र हे निवृत्त झाल्यानंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होईल.
राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांशिवाय, 2024 ची लोकसभा निवडणूक आणि अनेक विधानसभांच्या निवडणुका कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहेत.
निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी राजीव कुमार हे सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीईएसबी) अध्यक्ष होते.
‘सौदी अरामको’ बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी :
आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी ॲपल ही आता जगातील सर्वात मौल्यवान कंपनी राहिली नाही.
कारण, सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने तिला मागे टाकत हे स्थान मिळवले आहे.
मागील काही दिवसांत टेक कंपन्यांच्या शेअर्सची मागणी कमी होत असताना, तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सौदी अरामकोला याचा फायदा झाला आहे.
मात्र ॲपल अजूनही अमेरिकन कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे,
तर मायक्रोसॉफ्ट 1.95 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती :
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने इंग्लंडच्या पुरुष टेस्ट क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी इंग्लंडचे माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती केली आहे.
क्रिकेट बोर्डने तशी अधिकृत माहिती दिली असून मॅक्युलम लकवरच आपला कार्यभार स्वीकारणार आहे.
सध्या मॅक्युलम आयपीएलमध्ये खेळत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक आहेत.
40 वर्षीय ब्रेंडन मॅक्युलम यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव आहे.
इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलानला जेतेपद :
अतिरिक्त वेळेत इव्हान पेरेसिचने केलेल्या दोल गोलच्या बळावर इंटर मिलानने अंतिम सामन्यात युव्हेंटसला 4-2 अशा फरकाने नमवत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
तर या सामन्यात नियमित वेळेअंती दोन्ही संघांमध्ये 2-2 अशी बरोबरी होती.
त्यानंतर झालेल्या 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत इंटरच्या संघाने वर्चस्वपूर्ण खेळ केला.
पेरिसिचने 99व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत इंटरला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानेच मग 102व्या मिनिटाला आणखी एका गोलची भर घातल्याने इंटरने सामना 4-2 असा जिंकला.
दिनविशेष :
13 मे 1880 मध्ये थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.
अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन13 मे 1939 मध्ये सुरु झाले.
फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस 13 मे 1950 मध्ये सिल्व्हरस्टोन येथे झाली.
13 मे 1952 मध्ये भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.
ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला13 मे 1995 मध्ये बनली.
भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे 13 मे 1998 मध्ये केली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.