अमेरिकेतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सननंही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.
स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने करोनावर लस शोधून काढली आहे.
या लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस करोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.
गौमूत्र आणि शेणाचे अनेक फायदे अनेकांना माहितीच आहे. पण, गाईच्या शेणापासून आता चक्क अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे.
ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. हे आजारांविरोधात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगानं केला आहे.
कामधेनू आयोगानं गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे.
गाईचं शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गाईचं शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचं वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आहे.
गाईच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते.
आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.
2020चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर:
गेल्या आठवडा भरापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. नोबेल समितीकडून आज शेवटच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार, सन २०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर झाला आहे.
मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे.
हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे.
या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.
भारताचे माजी फुटबॉलपटू कार्लटन चॅपमन यांचे निधन:
भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्लटन चॅपमन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळूरु येथे सोमवारी पहाटे निधन झाले.
ते 49 वर्षांचे होते. बायचुंग भूतिया, आय. एम. विजयन आणि चॅपमन असे त्रिकूट 1990च्या दशकात प्रसिद्ध होते.
1990च्या सुरुवातीला टाटा फुटबॉल अकादमीकडून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1997 मध्ये सॅफ चषक पटकावला होता.
1996-97 मध्ये झालेली पहिलीवहिली नेशन्स फुटबॉल लीग जेसीटीने जिंकण्यात चॅपमन, भूतिया आणि विजयन या त्रिकुटाचे योगदान मोलाचे राहिले.
दिनविशेष:
13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.