‘महाकाल लोक कॉरिडॉर’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन :
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराभोवती उभारण्यात आलेल्या ‘महाकाल कॉरिडॉर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले.
900 मीटर लांबीच्या या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांसमवेत मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्प भगवान शिवाला समर्पित असून भारतातील 12 ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या या ज्योतिर्लिगाला भेट देणाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा प्रदान करेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या कॉरिडॉरसाठी दोन भव्य प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत. नंदी द्वार आणि पिनाकी द्वार. ही दोनही द्वारे काही अंतरावर असून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत या दोन्ही महाद्वारांतून जाता येईल.
या कॉरिडॉरमध्ये शिव पुराणमधील कथा दर्शविणारी 50 हून अधिक भित्तिचित्रे आहेत.
वाळूच्या दगडांनी तयार करण्यात आलेले 108 सुशोभित स्तंभ आहेत.
कॉरिडॉरमध्ये विविध देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत, त्याशिवाय हिंदू धर्मातील विविध कथा सांगणाऱ्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत.
कॉरिडॉरमधील 108 स्तंभांवर आनंद तांडव दाखवणारे दृश्य, भगवान शिव व देवी शक्ती यांची भित्तिचित्रे आणि 200 मूर्ती आहेत.
‘इन्फोसिस’चे अध्यक्ष रवी कुमार एस यांचा राजीनामा :
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या तिमाहीतील कंपनीच्या उत्पन्नाच्या घोषणेच्या अगोदरच अध्यक्षांचा राजीनामा आलेला आहे.
रवी कुमार हे अध्यक्ष या नात्याने इन्पोसिस सर्व्हिस्ड ऑर्गनायझेशनचे काम पाहत होते.
त्यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कन्सल्टिंग, पारंपारिक तंत्रज्ञान, डेटा आणि विश्लेषण, क्लाउड आणि इन्फ्रा सेवांचे काम पाहिले.
रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष :
माजी अष्टपैलू आणि 1983च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे.
18 ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्याच दिवशी मंडळाची निवडणूक पार पडेल.
गेल्या आठवडय़ाभरात ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या.
या बैठकांमध्ये विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजीचा सूर होता.
त्यामुळे ‘बीसीसीआय’चे 36वे अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांची ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी फेरनिवड होणे अपेक्षित आहे.
तसेच ‘बीसीसीआय’मधील अन्य मुख्य पदासांठी राजीव शुक्ला (उपाध्यक्ष), देवजित सैकिया (सहसचिव) आणि आशीष शेलार (कोषाध्यक्ष) हे उमेदवार आहेत.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुणसिंग धुमाळ हे सध्या ‘बीसीसीआय’मध्ये कोषाध्यक्षपद भूषवत आहेत.
दिनविशेष:
13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.