14 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

संस्कृत दिन

14 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2022)

‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला दिमाखात प्रारंभ :

  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला.
  • अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आणि प्रभात फेऱ्या काढून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
  • त्यांत राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी, विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभर उत्साहरंग उसळला असून देशाच्या अनेक भागांचा आसंमत तिरंगी रंगांत न्हाऊन निघाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2022)

नामांकित धावपटू लिडीया यांचे निधन :

  • 1980च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.
  • 1980च्या दशकातील धावण्याच्या शर्यतींवर लिडीया यांची जणू मक्तेदारी होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 15 सुवर्णपदकांची कमाई केली.
  • लिडीया यांनी 1987 मध्ये 100 मीटर शर्यत जिंकताना 11.28 सेकंद अशी सरस वेळ दिली होती.
  • 1982च्या नवी दिल्ली आणि 1986च्या सेऊल अशा दोन आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये तिने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
  • भारताच्या दिग्गज धावपटू पी. टी. उषा आणि लिडीया यांच्यात पदकांसाठी कायम चुरस असायची.

मेसीला बॅलन डी’ओर पुरस्काराच्या यादीतून वगळले :

  • सात वेळा विजेत्या लिओनेल मेसीला प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी यंदा 30 जणांच्या नामांकितांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही.
  • 2005 सालानंतर प्रथमच मेसीविना बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकितांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
  • अर्जेटिनाचा कर्णधार मेसीने पोलंडचा आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीला मागे टाकत गेल्या वर्षी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार मिळवला होता.
  • पॅरिस सेंट-जर्मेनकडून पहिल्या हंगामात खेळताना समाधानकारक कामगिरी न करता आल्याने मेसीला यंदा नामांकन देण्यात आले नाही.
  • 35 वर्षीय मेसीने 2019मध्येही हा पुरस्कार पटकावला होता.
  • लेवांडोवोस्की, किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, अर्लिग हालंड आणि पाच वेळा विजेता ख्रिस्तिआनो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा बॅलन डी’ओर पुरस्कारासाठीच्या नामांकितांच्या यादीत समावेश आहे.
  • यासह मोहम्मद सलाह, सादिओ माने, केव्हिन डीब्रूएने, हॅरी केन आणि सॉन ह्युंग-मिन हेसुद्धा या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.
  • मँचेस्टर सिटीकडून डीब्रूएने आणि हालंड यांच्यासह फिल फोडेन, जोओ कॅन्सेलो, रियाद महरेझ, बर्नाडरे सिल्वा यांना, तर लिव्हरपूलकडून ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्ड, लुइस डियाझ, फॅबिनिओ, डार्विन नुनेझ, सलाह आणि व्हर्जिल व्हॅन डाइक यांचाही या यादीत समावेश आहे.

दिनविशेष :

  • 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
  • लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
  • सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago