14 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 डिसेंबर 2019)
जगातील 100 प्रभावी महिलांत सीतारामन :
फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.
तर यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.
फोर्ब्सची 2019ची यादी ‘दी वर्ल्डस् 100 मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 29 व्या क्रमांकावर आहेत.
तसेच सीतारामन 34 व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.
पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड :
शास्त्रज्ञ आणि अस्ट्रोनॉट कँडिडेट असलेल्या पनवेलच्या प्रणित पाटीलची ‘नासा’च्या मानव संसाधन प्रकल्पात सहअन्वेषक म्हणून निवड करण्यात आली आहे.
मंगळावरील वाळवंटातील अनुसंधान प्रक्रियेसाठी लोकांच्या हालचालींचा शोध घेऊन मानवी सहभागाच्या झोपेच्या निर्णयक्षमतेबाबत अभ्यास या संशोधन प्रकल्पात केला जाणार आहे.
अमेरिकेतील युटा प्रांतात एमडीआरएस या संशोधन केंद्रावर हे संशोधन केले जाणार आहे. चंद्रावरील वातावरण या केंद्रावर कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे.
तर या संशोधनाला जानेवारी महिन्यात सुरु वात होणार आहे. याकरिता प्रणित पाटील हा जानेवारी महिन्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. प्रणित पाटीलसह 60 जण या संशोधनाचा भाग असणार आहेत.
आंध्र प्रदेशात बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद :
आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं ‘दिशा विधेयक 2019’ मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकात बलात्कार तसंच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसात खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आलं आहे.
तसेच याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी दोन विधेयकं मंजूर केली आहेत.
तर आंध्र प्रदेश दिशा कायद्यांतर्गत बलात्कासारख्या गंभीर गुन्ह्यात कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. नव्या कायद्यानुसार बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. याशिवाय खटला 14 दिवसात संपवून एकूण 21 दिवसात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे.
आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयं स्थापन करण्याला मंजुरी दिली आहे. यानुसार, महिला आणि लहान मुलांसंबंधी खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात न्यायालय उभारलं जाऊ शकतं.
पासपोर्टवर छापण्यात आलं आहे ‘कमळ’ चिन्ह :
बनावट पासपोर्ट ओळखता यावेत यासाठी नव्याने देण्यात येणाऱ्या पासपोर्टवर ‘कमळ’ चिन्ह छापण्यात आल्याचे सरकारच्या वतीने लोकसभेत स्पष्ट करण्यात आले. अन्य राष्ट्रीय चिन्हांचाही वापर करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
पासपोर्टवर कमळ चिन्ह छापण्याबाबतचा प्रश्न बुधवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला होता.
केरळमधील कोझिकोडे येथे नवे पासपोर्ट वितरित करण्यात आले त्यावर कमळ चिन्ह छापण्यात आले असल्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य एम. के. राघवन यांनी सभागृहात शून्य प्रहराला उपस्थित केला होता.
जागतिक बॅडमिंटन मालिकेत सिंधूला विजयाचा दिलासा :
‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्यातील आव्हान आधीच संपुष्टात आलेल्या पी. व्ही. सिंधूने अ-गटातील तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी लढतीत विजय मिळवला. तिने चीनच्या ही बिंग जियाओला रंगतदार लढतीत नमवले.
तर सलग दुसऱ्या पराभवानंतर सिंधूला आपले जेतेपद टिकवता येणार नाही, हे स्पष्ट झाले. मात्र सिंधूने बिंग जियाओला 21-19, 21-19 असे नामोहरम करून अ-गटात तिसऱ्या स्थानावर समाधान मानले.
सिंधूने बिंग जियाओविरुद्धची सलग चार पराभवांची मालिका खंडित करताना तिच्याविरुद्धच्या सामन्यांतील कामगिरी 6-9 अशी सुधारली आहे.
सिंधूला पहिल्या गेममध्ये सुरुवातीला झगडायला लावून बिंग जियाओने 7-3 अशी आघाडी घेतली होती. मग 11-6 अशी ही आघाडी वाढवली.
दिनविशेष:
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला होता.
अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
‘दुसरे महायुद्ध‘सन 1941 मध्ये जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
इंदिरा गांधी यांचे पुत्र ‘संजय गांधी‘ यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 मध्ये झाला होता.
सन 1961 मध्ये टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.