14 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

14 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 जानेवारी 2023)

निर्मला सीतारामन 1 फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार:

  • संसदेच्या अर्थसंक्लपीय अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे.
  • 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 66 दिवसांमध्ये एकूण 27 बैठका होतील.
  • तर 14 फेब्रुवारी ते 12 मार्च पर्यंत अवकाश घेतला जाणार आहे.
  • 12 मार्चपासून संसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोंधित करतील.
  • संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.

‘या’ देशाचा पासपोर्ट आहे सगळ्यात पॉवरफुल:

  • पासपोर्ट जपानचा असेल तर 193 देशांत व्हिसा-फ्री एन्ट्री मिळते.
  • ‘हेनली पासपोर्ट इंडेक्स’नुसार ही क्रमवारी ठरवण्यात येते.
  • या यादीत पाहिला क्रमांक मिळवण्याचे जपानचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
  • या क्रमवारीमध्ये सिंगापूर आणि साऊथ कोरिया यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे.
  • त्यानंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग यांचे नाव आहे.
  • तर या यादीत सर्वात शेवटी अफगाणिस्तानचे नाव आहे.
  • पासपोर्टधारक व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणाऱ्या देशांच्या संख्येनुसार ही क्रमवारी ठरवली जाते.
  • इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) कडुन मिळालेल्या डेटावरून ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ही क्रमवारी ठरवतात.
  • या 109 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 89 वा आहे.

जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
  • वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल.
  • तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • ‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ 51 दिवसांत 32 प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार 200 किमीचा प्रवास करणार आहे.
  • या क्रूझमध्ये 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.
  • तसेच मेन डेकवरील 40 सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे.
  • तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे.
  • याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.
  • या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.

सानिया मिर्झाचा प्रोफेशनल टेनिसला अलविदा:

  • भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिसला रामराम केला आहे.
  • प्रोफेशनल टेनिसमधून आपण निवृत्त होतो आहोत असा आशय असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर सानिया मिर्झाने लिहिली आहे.

भारताची स्पेनवर 2-० ने मात:

  • ओडिशामधील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे.
  • सलामीच्या पहिल्या सामन्यात त्याने स्पेनचा 2-0 असा पराभव केला.
  • भारताकडून या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले.
  • भारताचा दुसरा सामना आता 15 जानेवारीला बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे.
  • अमित रोहिदासला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दिनविशेष:

  • भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव व्दारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्म 14 जानेवारी 1896 रोजी झाला होता.
  • सन 1923 मध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 मध्ये झाला.
  • लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र 14 जानेवारी 1948 मध्ये सुरू झाले.
  • सन 1994 मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago