14 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 जून 2020)
भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार :
भारत आणि जपान सध्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भविष्यात हे दोन्ही देश चंद्र मोहिमेसाठी एकत्र येणार आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चंद्रयान मोहिमेची योजना आखली आहे.
तर या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.
मागच्यावर्षी चांद्रयान-2 मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.
तसेच भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम 2023 नंतर पार पडणार आहे.
भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. 2022 मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे.
तसेच लँडिंग मॉडयुल आणि रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल.
जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच 3 रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.
योगी आदित्यनाथ मजुरांच्या खात्यात पाठवणार 104 कोटी रुपये, 10 लाख 48 हजार :
लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला असून हातावर पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा मजुरांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
तर राज्यातील प्रत्येक मजुराच्या खात्यात एक हजार रुपये ट्रान्सफर केले जाणार आहे.
राज्यातील 10 लाख 48 हजार 666 मजुरांना याचा लाभ मिळणार असून यासाठी राज्य सरकारला 104 कोटी खर्च करावे लागणार आहेत.
तसेच याआधी स्थलांतरित मजुरांच्या खात्यात 611 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
नेपाळचा मोठा निर्णय, संसदेत विधेयकही केलं मंजूर :
सीमारेषेवरुन भारतासोबत तणाव वाढत असताना नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली आहे. नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली.
तर यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे.
नेपाळने नव्या नकाशात कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश आपल्या अख्त्यारित असल्याचं दाखवलं आहे.
तसेच नेपाळमधील कनिष्ठ सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. नेपाळच्या संसदेत 275 सदस्य असून 258 जणांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.
कनिष्ठ सभागृहात मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक वरील सभागृहात पाठवलं जाईल. तिथेही त्यांना विधेयक मंजूर करुन घ्यावं लागणार आहे.धानांनी निर्माण केलं पाहिजे असंही सांगितलं होतं.
क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं निधन :
भारताचे सर्वात वयस्कर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचं शनिवार सकाळी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते.
तर 1940 च्या दशकात ते एकूण 9 रणजी सामने खेळले होते. तसंच त्यांनी 9 रणजी सामन्यांमध्ये एकूण 277 धावा केल्या.
तसेच किक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायजी यांनी लेखन केलं. व्यवसायानं ते चार्टर्ड अकाऊंटंट होते.
खासगी प्रयोगशाळांत 2,200 रुपयांत चाचण्या :
राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीतजास्त 2,200 रुपये इतका दर आकारला जाणार असून, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2,800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.
तर 2 जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने समिती गठित करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता.
तसेच राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4,500 रुपये आकारत होत्या. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5,200 रुपये आकारले जात होते. मात्र, समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त 2,200 रुपये आकारले जातील, तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी 2,800 रुपये आकारले जातील.
दिनविशेष :
14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन‘ म्हणून पाळला जातो.
भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.
भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.
ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.