14 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 मे 2019)
पात्रता परीक्षेसाठी कोणतेही आरक्षण लागू नाही :
- आरक्षण प्रवेशांसाठी दिले जाते. त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने स्पष्ट केले.
- 2019च्या केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणीसाठी (सीटीईटी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांसाठी असलेले 10 टक्के लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या
सुट्टीकालीन खंडपीठाने हे स्पष्ट केले. - तसेच आरक्षण हे पात्रता परीक्षेसाठीही लागू आहे हा पूर्ण चुकीचा समज आहे. किंबहुना, ही केवळ पात्रता परीक्षा आहे आणि आरक्षण हे प्रवेशांमध्ये दिले जाते. त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे
न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. - तर आपले म्हणणे पटवून देताना 7 जुलै रोजी होणाऱ्या ‘सीटीईटी’ परीक्षेबाबतच्या अधिसूचनेचा दाखला याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिला. मात्र या अधिसूचनेत अनुसूचित जाती-जमातींनाही आरक्षण देण्यात आलेले नाही, असा टोला लगावत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
Must Read (नक्की वाचा):
‘F-21’ जेट कोणत्याही देशाला विकणार नाही :
- भारताने जर 114 ‘F-21’ या लढाऊ विमानांचे कंत्राट दिले, तर अन्य कोणत्याही देशांना या विमानांची विक्री करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन विमान कंपनी लॉकहीड मार्टिनने दिली आहे.
- लॉकहीडने फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत झालेल्या एअरो इंडिया शो दरम्यान ‘F-21’ विमानाचे अनावरण केले होते. तसेच हवाई दलाच्या सर्व गरजा या विमानाद्वारे पूर्ण होणार असल्याचे आश्वासनही कंपनीकडून देण्यात आले होते.
- तसेच जर कंपनीला ‘F-21’ लढाऊ विमानांचे कंत्राट मिळाले, तर भारत लॉकहीड मार्टिनच्या जागतिक लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानाचा हिस्सा बनेल, अशी माहिती कंपनीचे धोरण आणि व्यवसायिक विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी दिली.
- तर वायू दलाच्या 60 पेक्षा अधिक तळांवरून परिचालन करण्याच्या दृष्टीने या विमानांचे डिझाईन केले असून सुपिरिअर इंजिन मॅट्रिक्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आणि अधिक शस्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. अशा
प्रकारची क्षमता असलेली ‘F-21’ लढाऊ विमाने अन्य कोणत्याही देशाला देण्यात नाहीत, असेही लाल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. - गेल्या वर्षी हवाई दलाने 114 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 18 अब्ज डॉलर्सची प्राथमिक निविदा जारी केली होती.
- लॉकहीड F-21, बोईंगचे F-A-18, दसॉ एव्हिएशनचे राफेल, युरोफायटर टायफून, रशियन लढाऊ विमान मिग-35 आणि ग्रिपेन हे या व्यवहाराचे प्रमुख दावेदार मानले जातात.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी डी.एन. पटेल यांच्या नावाची शिफारस :
- सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून डी.एन.पटेल यांच्या नावाची शिफारस केली आहे.
- तसेच न्यायाधीश डी.एन. पटेल हे न्यायाधीश राजेंद्र मेनन यांची जागा घेतली. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश ए. बोबडे आणि न्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी न्यायाधीश पटेल यांच्या नावाची शिफारस केली.
- तर न्यायाधीश राजेंद्र मेनन हे जून महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी न्यायमूर्ती पटेल यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कॉलेजियमने केंद्राला त्यांच्या नावाची केली आहे. केंद्राने मंजुरी दिल्यावर,
राष्ट्रपतींच्या आदेशानंतर न्यायाधीश डी.एन. पटेल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होईल. - गेल्या दहा वर्षांपासून डी.एन.पटेल हे झारखंड उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. 2 फेब्रुवारी 2009 साली त्यांनी झारखंड उच्च न्यायलयाचे न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट 2012 साली त्यांना झारखंड ‘झारखंड राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणा’चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- तसेच 4 ऑगस्ट 2013 ते 15 नोव्हेंबर 2013 आणि 13 ऑगस्ट 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या कालावधीत न्यायाधीश पटेल यांच्याकडे झारखंड उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
‘हिंदुजा ब्रदर्स’ ब्रिटनमधील श्रीमंतांमध्ये अव्वल :
- ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये हिंदुजा बंधूंनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. हिंदुजा बंधूंनी तिसऱ्यांदा ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक गाठलंय.
- यापूर्वी 2014 आणि 2017 मध्ये श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा बंधू पहिल्या स्थानी होते. संडे टाइम्सने जारी केलेल्या यादीनुसार 22 अब्ज पौंड इतकी हिंदुजा बंधूंची मालमत्ता आहे.
- तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू आहेत. डेविड आणि सिमन रुबेन यांनी कार्पेट आणि भंगारातून त्यांचा व्यवसाय उभा केला. त्यांचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 18.664 बिलियन डॉलर आहे.
- संडे टाइम्सनुसार या यादीत 1000 व्यक्तींचा समावेश होतो. जमीन, मालमत्ता किती आहे यावरून ही यादी तयार होते.
- तसंच विविध कंपन्यांमधील शेअर्स किती आहेत या गोष्टीही लक्षात घेतल्या जातात असं संडे टाइम्सचं मत आहे.
लोकांच्या बँक खात्यात असलेला पैसा यात मोजला जात नाही.
दुकानदारांना क्यूआर कोड पर्याय होणार बंधनकारक :
- ‘यूपीआय’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या डिजिटल पेमेंटसाटी सर्व दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठानांना क्यूआर कोड बंधनकारक करण्याचा विचार सरकार करीत आहे. या पद्धतीचा वापर करणार्या ग्राहक आणि दुकानदार अशा दोघांनाही जीएसटी लाभ देण्यात येणार आहे.
- एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, क्यूआर कोडचा वापर केल्यास दुकानदार, व्यावसायिक अथवा रेस्टॉरंट चालक आणि ग्राहक अशा दोघांनाही प्रोत्साहन लाभ देण्याचा विचार आम्ही करीत आहोत.
- जीएसटी परिषदेने या योजनेस निवडणुकीपूर्वीच मान्यता दिली होती. त्यानुसार, आता या योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. क्यूआर कोड वापरात आणण्यासाठी कोणत्या प्रकारची पेमेंट व्यवस्था आवश्यक आहे, याचा तपशील गोळा
केला जात आहे. - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या संस्थेला योजनेत सहभागी करून घेण्यात येत आहे. ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल.
अंधांना नोटा ओळखण्यास मोबाइल अॅपची मदत :
- कमी दृष्टी किंवा पूर्णपणे अंध असलेल्यांना भारतीय चलनी नोटांचे मूल्य ओळखण्यासाठी मदत करणारे मोबाईल अॅप रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उपलब्ध करणार आहे.
- तर सध्या 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे.
- तसेच सध्या अंध व्यक्तींना 100 रुपयांच्या वरील चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी इन्टॅग्लिओ प्रिंटिंग बेसड् आयडेंटिफिकेशन मार्क्सचा उपयोग होतो आहे.
- मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तंत्रज्ञान कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.
- तर या मोबाईल अॅपद्वारे महात्मा गांधी मालिकेतील आणि महात्मा गांधी मालिकेतील (नवी) सर्व चलनी नोटा ओळखता आल्या पाहिजेत, असे बँकेने निवेदनात म्हटले.
- मोबाईल कॅमेऱ्यासमोर नोट ठेवल्यावर तिचा फोटो घेणे किंवा नोटेवरून कॅमेरा फिरवल्यास नोट ओळखता यावी. या अॅपद्वारे अवघ्या दोन किंवा त्यापेक्षा कमी सेकंदांत चलनी नोट ओळखता आली पाहिजे आणि हे अॅप इंटरनेट जोडणीशिवाय ऑफलाईनही वापरता आले पाहिजे.
- तसेच हे मोबाईल अॅप अनेक भाषांयुक्त असेल, तसेच ऑडिओ नोटिफिकेशन्ससह असावे. सध्या हे अॅप किमान हिंदी आणि इंग्रजी भाषेत अपेक्षित आहे.
दिनविशेष :
- 14 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा 14 मे 1960 मध्ये सुरू झाली.
- कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात 14 मे 1963 मध्ये प्रवेश.
- 14 मे 1657 मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा