13 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 नोव्हेंबर 2018)
फ्लिपकार्टचे सीईओ ‘बिन्नी बन्सल’ यांचा राजीनामा:
- फिल्पकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी 13 नोव्हेंबर रोजी तडकाफडकी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला. फिल्पकार्टवर आता वॉलमार्टचे नियंत्रण असून फिल्पकार्टचे 77 टक्के मालकी हक्क वॉलमार्टकडे आहेत. यावर्षी मे महिन्यात हा विक्रीचा व्यवहार झाला.
- बिन्नी बन्सल यांच्यावर गंभीर गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते. त्यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
- बिन्नी बन्सल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप झाले. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला त्यामुळे उद्योगक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
- फ्लिपकार्ट ग्रुपच्या सीईओ पदाचा आपण राजीनामा देत आहोत अशी घोषणा बिन्नी बन्सल यांनी केली. कंपनीच्या स्थापनेसापासून बन्सल यांची कंपनीमध्ये महत्वाची भूमिका होती. बिन्नी यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपास करणाऱ्या समितीला आढळले नाहीत.
- वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला त्यावेळी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी स्वत:चा पाच टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा सात हजार कोटींना विकला व कंपनीतून बाहेर पडले. पण बिन्नी यांनी स्वत:चा 5.5 टक्के हिस्सा राखून ठेवला होता. सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी 2007 साली अवघ्या चार लाख रुपयांच्या भांडवलावर फ्लिपकार्ट कंपनी सुरु केली होती.
बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी 71 वर्षांची (एके-47):
- 1945 साली सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी एके-47 निर्मिती केली. 1947 साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने या बंदूकीचा स्वीकार करुन तिचा वापर सुरु केला. त्या घटनेला 71 वर्षे झाली. त्या निमित्तानेच ‘गाथा शस्त्रांची’ सदरामधील सचिन दिवाण यांचा एके-47 ची माहिती सांगणारा हा लेख पुन:प्रकाशित करीत आहोत.
- सामान्यत: मशिनगनमध्ये वापरल्या जाणाऱ्या 7.62 मिमी. व्यासाच्या गोळ्या मिनिटाला 650च्या वेगाने 500 मीटर अंतरापर्यंत झाडणारी ‘एके-47‘ असॉल्ट रायफल ओळखली जाते ती तिच्या दमदार ‘पंच’साठी. किंग कोब्राने चावा घेतलेला माणूस जसा पाणी मागत नाही तसा ‘एके-47‘ ची गोळी वर्मी लागलेला माणूसही वाचणे अवघड. साधी पण भक्कम रचना, हाताळण्यातील सुलभता, देखभाल व दुरुस्तीची अत्यंत कमी गरज आणि कोणत्याही वातावरणात हुकमी कामगिरी बजावण्याची हमी ही ‘एके-47′ची वैशिष्टय़े. त्याच्या जोरावर जगभरच्या सेनादलांबरोबरच गनिमी योद्धय़ांच्या गळ्यातील ताईत बनलेली ‘एके-47‘ ही केवळ एक बंदूक न राहता तो एक ‘कल्ट’ बनला आहे.
- जगातील एकूण बंदुकांपैकी 20 टक्के (म्हणजे पाचपैकी एक) बंदुका ‘एके-47‘ आहेत. आजवर 75 दशलक्ष ‘एके-47‘ बनवल्या गेल्या आहेत. त्या मालिकेतील एके-74, एके-100, 101, 103 या बंदुका एकत्रित केल्या तर ही संख्या 100 दशलक्षच्या वर जाते. आफ्रिकेतील मोझांबिक या देशाच्या राष्ट्रध्वजावर ‘एके-47‘ची प्रतिमा आहे. इतकेच नव्हे तर ‘एके-47‘चे निर्माते मिखाइल कलाशनिकोव्ह यांचे रशियात पुतळे आहेत. कलाशनिकोव्ह नावाची व्होडकाही आहे.
अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनीलकुमार लवटे:
- देशिंग येथील अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुनीलकुमार लवटे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अग्रणी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी दयासागर बन्ने यांनी दिली.
- राज्यस्तरीय अग्रणी साहित्य पुरस्कार आणि देशिंग भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा देशिंग भूषण पुरस्कार हरोली येथील शामराव शेंडे यांना देण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
- साहित्य पुरस्काराच्या निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार साहित्य साधना पुरस्कार शांतिनाथ मांगले (बलवडी, सांगली), राज्यस्तरीय अग्रणी समग्र वाङ्मय पुरस्कार ‘भूतापाठी राजकारण’ या पुस्तकासाठी डॉ. प्रकाश जोशी (ठाणे-पूर्व), राज्यस्तरीय अग्रणी काव्यसंग्रह पुरस्कार, उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाणिवेच्या प्रदेशात काव्यसंग्रहासाठी डॉ. राजेंद्र माने (सातारा) यांना, विशेष काव्यसंग्रह पुरस्कार वाताहतीची कैफियत काव्य संग्रहासाठी संध्या रंगारी (आखाडा बाळापूर, हिंगोली) आणि गाऱ्हाणं काव्य संग्रहासाठी धनाजी घोरपडे (बहादूरवाडी, सांगली) यांना देण्यात येणार आहे.
दिनविशेष:
- 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन तसेच राष्ट्रीय बाल दिन म्हणून पाळला जातो.
- वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1765 मध्ये झाला होता.
- जेम्स ब्रूस यांनी सन 1770 मध्ये नाईल नदीचा स्रोत शोधला.
- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला.
- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना 14 नोव्हेंबर 1969 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा