14 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

14 November 2019 Current Affairs In Marathi

14 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 नोव्हेंबर 2019)

नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड :

  • रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे.
  • तर या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली.
  • तसेच यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.

रात्रीच्यावेळी ‘तेजस’चं अरेस्ट लँडिंग यशस्वी :

  • खास नौदलासाठी बनवण्यात आलेल्या तेजसच्या सागरी आवृत्तीची संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने रात्रीच्या वेळी केलेली अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली.
  • तर या चाचणीमधून डीआरडीओने अरेस्ट लँडिंग हाताळण्याचे आपले कौशल्य दाखवून दिले आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या चाचणीचा व्हिडीओ डीआरडीओने पोस्ट केला आहे.
  • तेजस हे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे. 12 नोव्हेंबरला 6.45 च्या सुमारास एसबीटीएफ गोव्यामध्ये एलसीए तेजसचे अरेस्ट लँडिंग करण्यात आले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही पहिली चाचणी आहे.
  • अरेस्ट लँडिंगच्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल, डीआरडीओ आणि एचएएलचे कौतुक केले आहे.
  • दोन महिन्यापूर्वीच गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील नौदलाच्या तळावर घेण्यात आलेली एलसीए तेजसची अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली होती. ही चाचणी दिवसा घेण्यात आली होती. सर्वसामान्य तेजस विमानाला उड्डाण आणि लँडिंगसाठी एक किलोमीटरची धावपट्टी लागते. तेजसच्या सागरी आवृत्तीमध्ये उड्डाणाला 200 मीटर आणि लँडिंगसाठी 100 मीटरची धावपट्टी लागते.

स्पेनचा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया निवृत्त :

  • स्पेनसाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
  • तर 37 वर्षीय व्हिया पुढील महिन्यात जे-लीगच्या मोसमाअखेरीस आपल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा करणार आहे.
  • तसेच व्हियाने बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले. याचप्रमाणे स्पेनसाठी तो 98 सामने खेळला आहे.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता अणेंचे पुस्तक :

  • ज्येष्ठ विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाच्या दस्तावेजांवर संपादित केलेल्या पुस्तकातून विद्यार्थी आता धडे घेऊ शकणार आहेत.
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या पुस्तकाला ‘एम.ए.’ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमात लावण्यास मान्यता दिली आहे.
  • तर विशेष म्हणजे अगोदर याच पुस्तकाला त्याच्या नावामुळे अभ्यासक्रमात लावण्यास विद्यापीठाने नकार दिला होता. झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत राज्यशास्त्र अभ्यासमंडळाकडून यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला.
  • तसेच कुलगुरुंनी पुस्तकात दिलेल्या माहितीचे वाचन केले. तसेच यात कुठलीही आक्षेपार्ह बाब नसल्याची भूमिका मांडली. अगोदरदेखील या पुस्तकावर चर्चा झाली होती व त्यावेळी अभ्यासमंडळाकडून झालेल्या चुकीचा उल्लेखामुळेच हा गैरसमज झाला होता, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सभागृहाने या प्रस्तावाला मान्यता दिली.

दिनविशेष:

  • 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन तसेच राष्ट्रीय बाल दिन म्हणून पाळला जातो.
  • वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1765 मध्ये झाला होता.
  • जेम्स ब्रूस यांनी सन 1770 मध्ये नाईल नदीचा स्रोत शोधला.
  • भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला.
  • जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना 14 नोव्हेंबर 1969 मध्ये झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Dr RB Singh says

    Good in

Leave A Reply

Your email address will not be published.