Education News

14 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारत बायोटेकच्या करोना लशीसंबंधी महत्त्वाची अपडेट:

14 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2020)

भारत बायोटेकच्या करोना लशीसंबंधी महत्त्वाची अपडेट:

  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी करोना लस विकसित करणाऱ्यांमध्ये भारत बायोटेकदेखील आघाडीवर आहे.
  • मात्र नुकतंच भारत बायोटेकने स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सीएनबीसी-टीव्ही 1 ने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी याआधी 750 स्वयंसेवकांवर चाचणी करणार होती, पण आता फक्त 380 स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • याशिवाय चाचणी घेतली जाणाऱ्या साइट्सची संख्याही कमी करण्यात आली आहे.
  • पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमधील सेरोकोव्हर्जन किंवा इम्यूनोजेनिसिटीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • पहिल्या टप्प्यात 375 निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता.
  • सध्या स्वयंसेवकांना डोस देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरु होती. स्वयंसेवकांना ताप आणि शारिरीक वेदना याशिवाय इतर कोणताही मोठा त्रास जाणवला नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
  • कोव्हॅक्सिन ही एक 2-डोसची लस असून 14 दिवसांच्या अंतराने दिली जाण्याची योजना आहे.
  • भारतात सध्या तीन लस वैद्यकीय टप्प्यात असून प्राथमिक निष्कर्ष हाती येण्यामध्ये जानेवारी उजाडेल आणि अंतिम निकाल मार्चच्या अखेर हाती येईल असं तज्ञांचं म्हणणं आहे.
  • टाइमलाइन कमी केल्याने कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याचा वेग वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • भारत बायोटेक इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लसीची निर्मिती करत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2020)

देशातील 66 टक्के गावांबरोबरच 40 टक्के शहरी भागात रोज खंडित होतो वीजपुरवठा:

  • देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षांहून अधिक कालावधी झाला असला तरी आजही देशातील अनेक भागांमध्ये 24 तास सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
  • वीज वितरण आणि वीज वाहून नेण्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, वीज वितरक कंपन्यांना होत असणारे नुकसान, वीज चोरी यासारख्या अनेक कारणांमुळे आजही अनेक ठिकाणी सलग 24 तास वीज उपलब्ध होत नाही.
  • काउन्सिल ऑफ एनर्जी, एनव्हायरमेंट अ‍ॅण्ड वॉटरने (सीईईडब्ल्यू) नुकताच स्टेट ऑफ इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्सेस इन इंडिया हा अहवाल सादर केला आहे.
  • या अहवालामध्ये देशातील दोन तृतीयांश गांवामध्ये आणि 40 टक्के शहरी भागांमध्ये दिवसातून किमान एकदा तरी वीजपुरवठा खंडित होतो असं म्हटलं आहे.
  • सीईईडब्ल्यूने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये देशातील बहुतांश जनतेला वीजकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
  • सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी 76 टक्के लोकांनी घरामध्ये अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो असं म्हटलं आहे.
  • सतत वीजपुरवठा खंडित होते आणि दिर्घकाळासाठी वीजपुरवठा खंडित होण्यात उत्तर प्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
  • त्या खालोखाल झारखंड, आसाम, बिहार आणि हरयाणा ही राज्ये आहेत. या राज्यांमध्ये अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि झाल्यास ही समस्या दिर्घकाळ असते असं सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यावर सॅम करनही झाला अवाक:

  • हैदराबादविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या.
  • चेन्नईच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीने केलेल्या 81 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली.
  • जाडेजाने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला 160च्या पार मजल मारून दिली.
  • हैदराबादकडून फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही पण वेगवान गोलंदाजांनी मात्र प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
  • नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा CSKला आधी फलंदाजीची संधी मिळाली.
  • नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला.
  • सॅम करनने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. खलील अहमदच्या गोलंदाजीवर करनने एकाच षटकात 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते.
  • पण संदीप शर्माने त्याला स्विंग गोलंदाजीची कमाल दाखवत 31 धावांवर त्रिफळाचीत केलं.

दिनविशेष :

  • 14 ऑक्टोबरजागतिक मानक दिन
  • भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ 14 ऑक्टोबर 1882 मध्ये सुरु झाले.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास 14 ऑक्टोबर 1920 मध्ये स्त्रियांना प्रवेश दिला.
  • 14 ऑक्टोबर 1924 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago