15 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 एप्रिल 2019)
क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सबलीकरणाची गरज:
- क्रीडाक्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना आणण्यासाठी आपल्या देशात व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने व्यक्त केले.
- दुहेरी आणि मिश्र दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया ही भारताची पहिली आणि एकमेव महिला टेनिसपटू आहे.
‘मेरी कोम, सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी भारतीय क्रीडाजगतात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. - त्याशिवाय दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांच्यासह किमान दहा महिला अव्वल खेळाडूंची नावे घेता येतील. तरीही क्रीडाक्षेत्रात महिलांना अद्यापही भेदभावाची वागणूक मिळत आहे,’ अशा शब्दांत सानियाने नाराजी व्यक्त केली.
- तर ‘फिक्की’ या महिला संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक सोहळ्यात सानिया बोलत होती.
राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह:
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण होते. राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- दरम्यान दादर येथील चैत्यभूमीवरही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी जल्लोषात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
- मुंबईमधील वरळी, दादर बीडीडी चाळींमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वरळी बीडीडी चाळ परिसरात महाआघाडीचे दक्षिण मुंबईमधील उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
- तर दुसरीकडे सोलापुरात रात्री 12 वाजता प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर चौकात उपस्थिती लावली. यावेळी पुष्प अर्पण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कऱण्यात आले.
मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष:
- बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकले आहे.
- बीएसपीने निवडणूक आयोगाकडे 25 फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती दिली असून यानुसार राजधानी दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 669 कोटी रुपये डिपॉजिट आहेत.
- 2014 लोकसभा निवडणुकीत आपले खातेही खोलू न शकलेल्या बीएसपीने आपल्या हातात सध्या 95.94 लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 471 कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट 11 कोटींनी कमी झाला.
- काँग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसकडे 196 कोटींचा बँक बॅलेन्स आहे. मात्र ही माहिती गतवर्षी 2 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे, काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आपल्या बँक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.
जगातील सर्वांत मोठ्या विमानाचे यशस्वी उड्डाण:
- उपग्रह प्रक्षेपक अग्निबाण जमिनीवरील अंतराळ तळाऐवजी थेट आकाशातूनच खूप उंचीवरून सोडण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले. अंतराळ विज्ञानास नवी दिशा देणारे पहिले पाऊल म्हणून हा प्रयोग ऐतिहासिक मानला जात आहे.
- मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक अब्जाधीश संस्थापक पॉल अॅलन यांनी गेल्या वर्षी दुर्धर आजाराने निधन होण्यापूर्वी खास ही मोहीम डोळ्यापुढे ठेवून स्थापन केलेल्या ‘स्ट्रॅटोलॉन्च’ या कंपनीच्या अजस्त्र आकाराचे हे विमान यशस्वीपणे हवेत उडाले याच्याएवढेच ते पुन्हा सुखरूपपणे जमिनीवर उतरले हेही लक्षणीय आहे.
- पंखांच्या पसाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या अशा या विमानाने माजावे हवाई व अंतराळ तळावरून उड्डाण केले. दोन तासांच्या फेरफटक्यात या विमानाने ताशी 304 किमी एवढा कमाल वेग व 17 हजार फुटांची उंची गाठली.
- एकाला एक जोडलेल्या दोन विमानांनासारखे दिसणारे हे विमान कोणतीही अडचण न येता पुन्हा सुखरूपपपणे उतरले तेव्हा हे आश्चर्य पाहण्यासाठी हजर असलेल्या प्रक्षकांनी आनंदाने जल्लोश केला.
यंदाचे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडियात होणार:
- नववे विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली.
- ‘पुरातन स्थापत्य शास्त्र’ हे या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र असून, या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ लेखिका माधवी वैध यांनी केले.
- गायकवाड म्हणाले, ‘शिवसंघ प्रतिस्थान अनई विश्व मराठी परिषदेतर्फे हे संमेलन भरविण्यात येणार आहे. कंबोडियातील बाराव्या आणि तेरावहया शकतातील शेकडो मंदिरांची स्थापना हिंदू राजा सूर्यवर्ननने केली. आधुनिक साधनांशिवाय त्या मंदिरावरील अप्रतिम कोरीव नक्षी, मंदिराचे स्थापत्य शास्त्र हे यंदाचे संमेलन कंबोडियात आयोजित करण्यामागचा हेतु आहे. असे अलौकिक आणि अदभूत वास्तुशिल्प अनुभवण्याची संधि संमेलनानिमित्त नागरिकांना मिळणार आहे.
- यंदाही पुरातन स्थापत्य शास्त्र या ख्सेत्राशी संबंधित ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि लेखक यात सहभागी होणार आहेत. याशिवाय मराठीतून विविध ज्ञान शाखांमध्ये अध्ययन, संशोधन, लेखन करणार्यांना संमेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.
दिनविशेष:
- 15 एप्रिल हा दिवस ‘जागतिक कला दिन‘ तसेच ‘जागतिक सांस्कृतिक दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु ‘गुरु नानक देव‘ यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी झाला होता.
- सन 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
- आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज 1912 यासाली उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते.
- 15 एप्रिल 2013 हा दिवस संत साहित्याचे अभ्यासक ‘वि.रा. करंदीकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा