केंद्र सरकारला रिझव्र्ह बँकेने अपेक्षित सहकार्याचा हात देऊ केला आहे:
करोना आणि टाळेबंदीबाबतच्या पाश्र्वभूमीवर तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारला रिझव्र्ह बँकेने अपेक्षित सहकार्याचा हात देऊ केला आहे.
वित्तीय तुटीची चिंता भेडसावणाऱ्या सरकारला रिझव्र्ह बँक 57,128 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करणार आहे.
रिझव्र्ह बँकेकडील कोटय़वधीच्या वरकड रकमेबाबत केंद्र सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही होते.
यामुळे माजी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल तसेच माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
केंद्र सरकारमध्ये वित्त विभागाचे सचिवपद भूषविलेल्या शक्तिकांत दास यांची मध्यवर्ती बँके च्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मात्र या मुद्दय़ावर सहकार्याचीच भूमिका आजवर घेतलेली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली आधीच्या वर्षांत 1.76 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. यामध्ये 1.23 लाख कोटी रुपये लाभांश व 52,637 कोटी रुपये अतिरिक्त तजविजेपोटीची रक्कम यांचा समावेश आहे.
नरेश कुमार यांनाही सातव्यांदा शौर्य पदक मिळाले:
बाटला हाऊस चकमकीत 2008 मध्ये मारले गेलेले दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना सातव्यांदा मरणोत्तर शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
19 सप्टेंबर 2008 रोजी बाटला हाऊस चकमक झाली होती त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते.
2009 मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे.
शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण 81 तर केंद्रीय राखीव पोलीस दलास 55 पदके जाहीर झाली आहेत.
उच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश प्रिस्क्रिप्शन कॅपीटल लेटर्समध्ये लिहावे:
ओडिशा उच्च न्यायालयाने सोमवारी एका सुनावणीदरम्यान सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये तसेच इतर आरोग्य शिबिरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांना देण्यात येणारे औषधांचे प्रिस्क्रिप्शन कॅपीटल लेटर्समध्ये लिहावे असे आदेश दिले आहेत.
प्रिस्क्रिप्शन वाचता येण्यासाठी ते कॅपीटल लेटरमध्ये लिहावेत असं न्यायालयाने म्हटलं आहे.
एका अर्जदाराने पत्नीची काळजी घेण्यासाठी जामीन देण्यासंदर्भात केलेल्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्या. एस. के. पानीगराही यांनी हे आदेश दिले आहेत.
हा अर्ज करताना पुरावा म्हणून या व्यक्तीने डॉक्टरांनी पत्नीच्या उपचारासाठी लिहून दिलेल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली.
यावेळी न्यायालयाने या कागदपत्रांवरील अक्षर कोणत्याही समान्य माणसाला समजण्यासारखे नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
भारत बायोटेक लस सुरक्षित असल्याचा दावा:
भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणींमध्ये लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.
भारतातील 12 शहरांमध्ये 375 स्वयंसेवकांवर करोना लसीची चाचणी करण्यात आली.
प्रत्येक स्वयंसेवकाला या लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
‘एमसीए’च्या बैठकीत- गावस्कर यांच्या विशेष सत्काराचा मुद्दा:
पोर्ट ऑफ स्पेन येथे 1971मध्ये महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केलेल्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) उत्सुक आहे.
‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेच्या 18 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीतील विषय पत्रिकेत या मुद्दय़ाचा समावेश करण्यात आला आहे.
‘एमसीए’ची बैठक 14 ऑगस्टला होणार होती, परंतु ती चार दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
6 मार्च, 2021 या दिवशी गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याची आमची योजना आहे, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे.
दिनविशेष :
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.
मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना15 ऑगस्ट 1862 मध्ये झाली.
पं. नेहरू15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
15 ऑगस्ट 1948 मध्ये दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
15 ऑगस्ट 1960 मध्ये कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.