15 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 जानेवारी 2023)
महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा:
पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले.
दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्या अगोदर या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना एक आनंदाची बातमी दिली.
भाषणात त्यांनी राज्य सरकारने कुस्तीपटूंचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.
राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो. आता ते मानधन 20 हजार करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घोषित करूया.
हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो, ते आता 15 हजार रुपये मानधन हे देण्याच निर्णय या ठिकाणी जाहीर केलं.
जागतिक स्तरावर विविध प्रकारचे शमन पर्याय लागू केल्यास हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने काढला आहे.
जगातील सुमारे एक चतुर्थाश वीज नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्पांमधून निर्माण होते.
यामुळे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जन आणि हवामानबदलावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतो.
नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जाप्रकल्प सुमारे दहा टक्के ऊर्जासंबंधित उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत.
आता मॅकगिल विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने देशानुसार उत्सर्जनाचे प्रमाण मोजण्यासाठी जगभरातील 108 देशांची माहिती जमविली आहे.
वायूवर चालणाऱ्या ऊर्जेच्या जीवनचक्रातून एकूण जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण दरवर्षी 3.6 अब्ज टन आहे.
तसेच जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या शमन पर्यायांची अंमलबजावणी केल्यास सुमारे 71 टक्क्यांनी हे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते, असा निष्कर्ष या चमूने काढला.
अधिक कार्यक्षम वनस्पतींद्वारे हरितगृह वायू उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी केले जाऊ शकते.
अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया आणि जपान, हे देश जगभरातील सर्वात मोठे गॅस उत्पादक आणि ग्राहक आहेत.
अॅल्युमिनिअम उद्योगातील कचऱ्यापासून क्ष-किरण विरोधी टाईल्सची निर्मिती:
देश- विदेशात अॅल्युमिनिअम- स्टिल उद्योगातून निघणाऱ्या कचऱ्याची (लाल गाळ) विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे.
या कचऱ्यावर भोपाळच्या सीएसआरआय- अॅडव्हान्स मटेरियल अॅन्ड प्रोसेस रिसर्च इन्स्टिटय़ूटने (सीएसआयआर- एम्प्री) संशोधन करत क्ष- किरण विरोधी टाईल्स तयार केली.
ही टाईल्स एक्स-रे, सीटी स्कॅन तपासणी यंत्राच्या खोलीत लावणे फायदेशीर आहे.
या संशोधनाला स्वामित्व हक्कही मिळाले आहे.
नागपुरातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या सीएसआईआर- एम्प्रीतर्फे ही टाईल्स प्रदर्शनात ठेवली होती.
भारतातही अॅल्युमिनिअम व स्टिल उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून आपला देश लाल चिखल तयार करणाऱ्या देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
या चिखलाच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भोपाळच्या सीएसआईआर- एम्प्री संस्थेने संशोधन सुरू केले.
शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी:
पुण्यात शनिवार 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली.
यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला.
महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे.
तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.
दिनविशेष :
राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून 15 जानेवारी 1559 मध्ये वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.
पानिपतचे तिसरे युद्ध15 जानेवारी 1761 मध्ये संपले.
एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट 15 जानेवारी 1861 मध्ये मिळाले.
द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे 15 जानेवारी 1889 मध्ये स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे 15 जानेवारी 1949 मध्ये हाती घेतली.
मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा 15 जानेवारी 1970 मध्ये झाले.
जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9 वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे 15 जानेवारी 1973 मध्ये हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे 15 जानेवारी 1996 मध्ये करण्यात आले.
गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार15 जानेवारी 1999 मध्ये प्रदान करण्यात आला.
सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर 15 जानेवारी 2001 मध्ये मध्ये प्रथमच उपलब्ध झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.