15 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
15 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 नोव्हेंबर 2019)
नोव्हेंबर 2020 मध्ये चंद्रावर लँडिंगचे लक्ष्य, इस्रोकडून मिशनची तयारी सुरु :
- पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा
अनुभव गाठिशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. - तर इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेवर काम सुरु केले आहे. माहितीनुसार, या मोहिमेसाठी नोव्हेंबर 2020 पर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
- तसेच इस्रोने वेगवेगळया समित्या स्थापन केल्या असून ऑक्टोंबरपासून या समित्यांच्या आतापर्यंत चार उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत.
- चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे नव्या मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हरचा समावेश करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे :
- पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी स्वीकारले आहे.
- ब्रिक्स परिषदेत मोदी आणि बोल्सोनारो यांची भेट झाली त्या वेळी मोदी यांनी बोल्सोनारो यांना निमंत्रण दिले. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये फलदायी चर्चा झाली. ब्राझीलच्या अध्यक्षांनी मोठय़ा व्यापारी शिष्टमंडळासह
भारतामध्ये येण्याची तयारी दर्शविली आहे.
‘शबरीमला’चा वाद सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे :
- शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय आता सात न्यायमूर्तीचे खंडपीठ घेणार आहे. या संदर्भातील फेरविचार याचिकेवर तीन विरुद्ध दोन अशा बहुमताने सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
- तर धर्माशी निगडित प्रथा-परंपरांचा सखोल आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मांडले.
- तर शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी असल्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील समान हक्कांचा आधार घेत सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशास मुभा दिली.
- तसेच 28 सप्टेंबर 2018 रोजी बहुमताने दिलेला हा निकाल घटनापीठाच्या पुढील निकालापर्यंत कायम राहणार आहे. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही.
दुतीचंदला ‘टाईम नेक्स्ट 100’मध्ये स्थान :
- वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या ‘टाईम नेक्स्ट 100’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
- तर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 100 व 200 मीटर प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. नेपोली येथे विश्व विद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
दिनविशेष:
- 15 नोव्हेंबर 1949 रोजी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
- सन 1971 इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप 4004 प्रकाशित केले.
- भारतीय लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 मध्ये झाला.
- सचिन तेंडुलकरने 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले होते.
- सन 2000 मध्ये झारखंड हे देशाचे 28वे राज्य तयार झाले.
- 15 नोव्हेंबर 1982 हा दिवस ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते “आचार्य विनोबा भावे” यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा