15 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जागतिक विद्यार्थी दिन
जागतिक विद्यार्थी दिन

15 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2022)

रशियाच्या निषेध ठरावावर भारत तटस्थ :

  • युक्रेनमध्ये रशियाने घेतलेले सार्वमत आणि चार प्रांतांचे केलेले एकतर्फी विलीनीकरण याविरोधात संयुक्त राष्ट्र महासभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
  • हा ठराव 143 विरुद्ध 5 अशा मोठय़ा मताधिक्याने स्वीकारण्यात आला.
  • भारतासह चीन, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, थायलंड, व्हिएतनाम आदी 35 देश तटस्थ राहिले.
  • तर रशिया, बेलारूस, उत्तर कोरिया, सीरिया आणि निकारगुआ या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले क्षेपणास्र :

  • समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे.
  • या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे.
  • शुक्रवारी पहाटे 1 वाजून 49 मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्र डागले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.
  • 2018 मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
  • हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.
  • दरम्यान, 4 ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्र डागले होते.

भारत अन्य देशांना 5 जी तंत्रज्ञान देण्यास सज्ज :

  • भारतातील 5 जी (5G) तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.
  • भारताच्या 5 जी तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे सीतारामण यांनी अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज’मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.
  • देशात लॉन्च करण्यात आलेले 5 जी तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सीतारामण यांनी सांगितले आहे.
  • 1 ऑक्टोबरला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड :

  • आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआयने) मोठी घोषणा केली.
  • जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड करण्यात आली.
  • दुखापतीमुळे आधीच भारताला मोठा धक्का बुमराहच्या रूपाने बसला होता आणि शमी देखील कोरोनामुळे आजारी असल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.
  • जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
  • मोहम्मद शमी याने मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) म्हणजेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली होती.

दिनविशेष:

  • 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आहे.
  • सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
  • 15 ऑक्टोबर 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
  • वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला.
  • हरगोविंद खुराणा यांना सन 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.