15 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 ऑक्टोबर 2022)
रशियाच्या निषेध ठरावावर भारत तटस्थ :
युक्रेनमध्ये रशियाने घेतलेले सार्वमत आणि चार प्रांतांचे केलेले एकतर्फी विलीनीकरण याविरोधात संयुक्त राष्ट्र महासभेत मांडण्यात आलेल्या ठरावावर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
हा ठराव 143 विरुद्ध 5 अशा मोठय़ा मताधिक्याने स्वीकारण्यात आला.
भारतासह चीन, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, थायलंड, व्हिएतनाम आदी 35 देश तटस्थ राहिले.
तर रशिया, बेलारूस, उत्तर कोरिया, सीरिया आणि निकारगुआ या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे.
या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे.
शुक्रवारी पहाटे 1 वाजून 49 मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्र डागले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.
2018 मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.
दरम्यान, 4 ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्र डागले होते.
भारत अन्य देशांना 5 जी तंत्रज्ञान देण्यास सज्ज :
भारतातील 5 जी (5G) तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.
भारताच्या 5 जी तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे सीतारामण यांनी अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज’मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.
देशात लॉन्च करण्यात आलेले 5 जी तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सीतारामण यांनी सांगितले आहे.
1 ऑक्टोबरला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड :
आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआयने) मोठी घोषणा केली.
जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड करण्यात आली.
दुखापतीमुळे आधीच भारताला मोठा धक्का बुमराहच्या रूपाने बसला होता आणि शमी देखील कोरोनामुळे आजारी असल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मोहम्मद शमी याने मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) म्हणजेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली होती.
दिनविशेष:
15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ आहे.
सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
15 ऑक्टोबर 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला.
हरगोविंद खुराणा यांना सन 1968 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.