15 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
15 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2021)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते‘संसद टीव्ही’चा होणार शुभारंभ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील.
- तर या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वेकंय्या नायडू, लोकसभा स्पीकर ओम बिरला उपस्थित राहणार आहेत.
- संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दाखवणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचं सरकारनं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
- तसेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे.
- सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती :
- श्रीलंका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
- वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने मंगळवारी समाजमाध्यमावर संदेश लिहीत निवृत्तीची घोषणा केली.
- तर त्याने यावर्षी जानेवारीमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
- आता त्याने ट्वेन्टी-20 क्रिकेटलाही अलविदा केले आहे.
- मलिंगाने 30 कसोटी सामन्यांत 101 बळी, 226 एकदिवसीय सामन्यांत 338 बळी आणि 84 ट्वेन्टी-20 सामन्यांत 107 बळी घेतले होते.
‘गॅलरी’ चाचणी ठरणार वरदान:
- ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) या संस्थेनं एक आरोग्य चाचणी सुरु केली आहे.
- तर ही चाचणी यशस्वी झाल्यास भारतासह अनेक देशांमध्ये कर्करोगाचं निदान आणि उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणर आहे.
- तसेच व्यक्तीमध्ये लक्षणं दिसण्यापूर्वी कर्करोग शोधू शकते असं सांगण्यात येत आहे.
- डोकं, गळा, आतडी, फुफ्फुस, अन्ननलिका या भागातील कर्करोग शोधण्यातही मदत होणार आहे.
- हेल्थकेअर कंपनी ग्रेलद्वारे होणारी ‘गॅलरी चाचणी’ रक्तातील कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी करते.
- तर चाचणीसाठी यूकेच्या आठ भागातून 1.40 लाख स्वयंसेवकांची चाचणी करण्याची योजना आहे. जेणेकरून व्यापक वापरासाठी त्याची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे शोधता येईल.
उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी :
- लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असून हे क्षेपणास्त्र नव्याने तयार करण्यात आले आहे.
- तर बऱ्याच दिवसानंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली असून त्यामुळे लष्करी क्षमता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
- संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाचे हे पहिले अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असू शकेल.
- तसेच या प्रक्षेपणाची दृश्यचित्रे दाखवण्यात आली. त्यात चलत क्षेपणास्त्रवाहकाचा समावेश होता.
- तर त्याची क्षमता 1500 कि.मी वरील लक्ष्य भेदण्याची असून शनिवारी व रविवारी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
दिनविशेष :
- भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा 15 सप्टेंबर 1861 मध्ये मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला.
- 15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिंफोमा जागृती दिन तसेच राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
- सन 1935 मध्ये भारताचे पहिले पब्लिक स्कूल ‘द डून स्कूल’ सुरू झाले.
- सन 1935 मध्ये जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
- भारतीय सैन्याने सन 1948 मध्ये निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
- सन 1953 मध्ये श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
- प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सन 1959 मध्ये सुरू झाली.