15 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2021)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते‘संसद टीव्ही’चा होणार शुभारंभ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील.
तर या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वेकंय्या नायडू, लोकसभा स्पीकर ओम बिरला उपस्थित राहणार आहेत.
संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दाखवणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचं सरकारनं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे.
सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीलंका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने मंगळवारी समाजमाध्यमावर संदेश लिहीत निवृत्तीची घोषणा केली.
तर त्याने यावर्षी जानेवारीमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
आता त्याने ट्वेन्टी-20 क्रिकेटलाही अलविदा केले आहे.
मलिंगाने 30 कसोटी सामन्यांत 101 बळी, 226 एकदिवसीय सामन्यांत 338 बळी आणि 84 ट्वेन्टी-20 सामन्यांत 107 बळी घेतले होते.
‘गॅलरी’ चाचणी ठरणार वरदान:
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) या संस्थेनं एक आरोग्य चाचणी सुरु केली आहे.
तर ही चाचणी यशस्वी झाल्यास भारतासह अनेक देशांमध्ये कर्करोगाचं निदान आणि उपचारांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणर आहे.
तसेच व्यक्तीमध्ये लक्षणं दिसण्यापूर्वी कर्करोग शोधू शकते असं सांगण्यात येत आहे.
डोकं, गळा, आतडी, फुफ्फुस, अन्ननलिका या भागातील कर्करोग शोधण्यातही मदत होणार आहे.
हेल्थकेअर कंपनी ग्रेलद्वारे होणारी ‘गॅलरी चाचणी’ रक्तातील कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी करते.
तर चाचणीसाठी यूकेच्या आठ भागातून 1.40 लाख स्वयंसेवकांची चाचणी करण्याची योजना आहे. जेणेकरून व्यापक वापरासाठी त्याची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे शोधता येईल.
उत्तर कोरियाकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी :
लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला असून हे क्षेपणास्त्र नव्याने तयार करण्यात आले आहे.
तर बऱ्याच दिवसानंतर उत्तर कोरियाने ही चाचणी केली असून त्यामुळे लष्करी क्षमता वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
संरक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, उत्तर कोरियाचे हे पहिले अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असू शकेल.
तसेच या प्रक्षेपणाची दृश्यचित्रे दाखवण्यात आली. त्यात चलत क्षेपणास्त्रवाहकाचा समावेश होता.
तर त्याची क्षमता 1500 कि.मी वरील लक्ष्य भेदण्याची असून शनिवारी व रविवारी त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
दिनविशेष :
भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा 15 सप्टेंबर 1861 मध्ये मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला.
15 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिंफोमा जागृती दिन तसेच राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
सन 1935 मध्ये भारताचे पहिले पब्लिक स्कूल ‘द डून स्कूल’ सुरू झाले.
सन 1935 मध्ये जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
भारतीय सैन्याने सन 1948 मध्ये निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
सन 1953 मध्ये श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा सन 1959 मध्ये सुरू झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.