16 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
16 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2020)
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे.
39 वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना,‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची सुरूवात करण्याची घोषणा केली आहे.
तसेच, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात आणखी एक आणि अतिशय मोठे असे अभियान सुरू होत आहे.
‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आता तुमची प्रत्येक तपासणी, प्रत्येक आजार, तुम्हाल कोणत्या डॉक्टरने कोणते औषध दिले, कधी दिले, तुमचे रिपोर्ट काय होते ही सर्व माहिती या एकाच हेल्थ आयडीमध्ये असेल.
या अभियनाांतर्गत वैयक्तिक वैद्यकीय माहिती, तपासणी केंद्र, वैद्यकीय संस्था व स्टेट मेडिकल काउंसिलला डिजिटल करण्याची योजना आहे.
मोहनचंद शर्मा, नरेश कुमार यांना सातव्यांदा शौर्य पदक :
19 सप्टेंबर 2008 रोजी बाटला हाऊस चकमक झाली होती त्यात गंभीर जखमी झाल्यानंतर शर्मा यांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता.
बाटला हाऊस येथे लपलेल्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ते पथकासह गेले होते. 2009 मध्ये त्यांना अशोकचक्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतरही अनेकदा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक कमांडंट नरेश कुमार यांनाही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी मोहिमेत सातव्यांदा शौर्य पदक मिळाले आहे.
शौर्य पदकात जम्मू-काश्मीर पोलिसांना एकूण 81 तर केंद्रीय राखीव पोलीस दलास 55 पदके जाहीर झाली आहेत.
एकूण 926 पदके जाहीर करण्यात आली. त्यात शौर्य पदके, विशेष सेवा व इतर पदकांचा यात समावेश आहे.
धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती :
धोनीपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
2018 मध्ये रैना आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर 2015 मध्ये तो अखेरचा कसोटी सामना खेळला.
रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
रैनानं आतापर्यंत भारतासाठी 18 कसोटी सामने, 226 एकदिवसीय सामने आणि 78 टी-20 सामने खेळले आहेत. तर त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा आहेत.
दिनविशेष :
16 ऑगस्ट 1913 मध्ये स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन16 ऑगस्ट 1960 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
16 ऑगस्ट 1962 मध्ये आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
जपानला मागे टाकुन चीन ही 16 ऑगस्ट 2010 मध्ये जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.