Current Affairs (चालू घडामोडी)

16 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2018)

ओबामाकेअर योजना घटनाबाह्य :

  • ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल संघराज्य न्यायाधीशांनी दिला असून त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे.
  • टेक्सासच्या संघराज्य न्यायाधीशांनी संपूर्ण अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट रद्दबातल ठरवला असून हा कायदा म्हणजेच ओबामाकेअर योजना होय. व्यक्तिगत पातळीवर आरोग्य सुरक्षेसाठी ओबामा प्रशासनाने ही योजना आणली होती.
  • तर रिपब्लिकन पक्षाचे काही गव्हर्नर व राज्यांचे महाधिवक्ते यांच्या गटाने ओबामाके अरविरोधात याचिका दाखल केली होती.
  • तसेच सर्वोच्च न्यायालयाने ओबामाकेअरचा अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट हा 2012 व 2015 मध्ये घटनात्मक पातळीवर योग्य ठरवला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2018)

महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा :

  • श्रीलंकेतील सत्तासंघर्ष संपवताना महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
  • तसेच त्यांची नेमणूक करण्याचा वादग्रस्त निर्णय अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी घेतला होता.
  • आता रनिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होईल.
  • तर राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निकालानंतर राजीनामा दिला असून न्यायालयाने संसद बरखास्त करण्याचा निर्णय व राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य ठरवली होती.

मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदी झोरमथंगा यांचा शपथविधी :

  • मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरमथंगा यांचा मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांच्यासह एकूण बारा मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल के. राजशेखरन यांनी राजभवनात त्यांना अधिकारपद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • तर झोरमथंगा यांनी मिझो भाषेत शपथ घेतली. ईशान्येकडील मिझोराम राज्याचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
  • यापूर्वी ते एमएनएफच्या राजवटीत 1998 व 2003 मध्ये मुख्यमंत्री होते. तानलुविया हे उपमुख्यमंत्री झाले.
  • झोरमथंगा यांच्यासह इतर अकरा मंत्र्यांना शपथ देण्यात आली, त्यात पाच कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत. पाच कॅबिनेट मंत्र्यांत तानलुविया, आर. लालथनग्लियाना, लालचमालियाना, लालझिरिलियाना, लालरिनसंगा यांचा समावेश आहे. सहा राज्यमंत्र्यांत के.लालरिनलियाना, लालचंदमान राल्ते, लालरूट किमा, डॉ. के. बेइशुआ, टी.जे. लालनुनतलुआंगा, रॉबर्ट रोमाविया राल्ते यांचा समावेश आहे.

महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवत विद्यापीठातून हटवण्यात आला पुतळा :

  • महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा रातोरात हलवण्यात आला आहे. अफ्रिकेतील घाना विद्यापीठात ही घटना घडली आहे.
  • आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.
  • घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली तसेच त्यासाठी आंदोलनही सुरु झाले. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटवला.

कॅप्टन कोहलीचा नवा विक्रम:

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 172 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
  • कोहलीने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने एका वर्षात आपले 20वे अर्धशतक पूर्ण केले आणि कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम नावावर केला.
  • तर विराटने चालू कॅलेंडर वर्षात 19 पेक्षा अधिक वेळा अर्धशतक ठोकली. त्याने चौथ्यांदा हा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
  • तसेच आजच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दिनविशेष :

  • 16 डिसेंबर 1497 मध्ये वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
  • अमेरिकन राज्यक्रांती 16 डिसेंबर 1773 मध्ये बॉस्टन टी पार्टी.
  • 16 डिसेंबर 1854 मध्ये भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
  • 16 डिसेंबर 1946 मध्ये थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर 16 डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्राला समर्पित.
  • 16 डिसेंबर 1911 मध्ये पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago