Current Affairs (चालू घडामोडी)

16 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

16 December 2019 Current Affairs

16 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2019)

सरकारचे ‘जीम्स’ अ‍ॅप :

  • व्हॉट्सअ‍ॅपसारख्या लोकप्रिय संपर्क समाजमाध्यमाची सरकारी आवृत्ती लवकरच सेवेत येण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकार अंतर्गत सुरक्षित वापरासाठी ‘जीआयएमएस’ (गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टिम)अर्थात ‘जीम्स’ अ‍ॅपची चाचणी घेत आहे.
  • तर ओडिशासह काही राज्यांमध्ये ‘जीम्स’ अ‍ॅपची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आहे आहे. हे अ‍ॅप चाचणी तत्त्वावर तपासून पाहण्यासाठी भारतीय नौदलालाही देण्यात आले असल्याचे समजते.
  • नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) केरळ युनिटतर्फे तयार आणि विकसित करण्यात आलेले ‘जीम्स’ अ‍ॅप केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग आणि संस्था यांच्यात संस्थांतर्गत आणि परस्पर संपर्कासाठी वापरले जाणे अपेक्षित आहे.
  • तसेच परदेशात असलेल्या किंवा परदेशी कंपन्यांच्या मालकीच्या अ‍ॅपबाबत सुरक्षेच्या मुद्यावर नेहमीच चिंता व्यक्त करण्यात येत असते. सुरक्षेची चिंता दूर करण्याबरोबरच ‘व्हॉट्सअ‍ॅप’साठी सुरक्षित भारतीय पर्याय म्हणून हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच ‘जीम्स’ अ‍ॅपसाठी ‘एंड टू एंड एन्क्रिप्शन’ची प्रणाली अवलंबण्यात आली आहे.
  • भारतातील शेकडो व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांविरोधात ‘पेगॅसस’ नावाचे पाळत ठेवणारे तंत्रज्ञान वापरण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपने कबुली दिली होती. यानंतर पाळत प्रकरणामुळे भारत सरकारवर टीका होऊ लागली होती. .
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2019)

जमैकाची टोनी सिंह विश्वसुंदरी :

  • विश्वसुंदरी स्पर्धेत जमैकाच्या टोनी अ‍ॅन सिंह हिने विश्वसुंदरी 2019 किताब पटकावला असून भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
  • तर जमैकाची तेवीस वर्षीय टोनी अ‍ॅन सिंह हिला विजेती घोषित करण्यात आले.
  • ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील पीअर्स मॉर्गन यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. टोनी अ‍ॅन सिंह ही इंडो कॅरेबियन वडील ब्रॅडशॉ सिंह व आफ्रिकन कॅरबियन आई जारिन बेली यांची कन्या असून ती फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत महिला अभ्यास व मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे.
  • तर स्पर्धेच्या वेळी तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तिने व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘आय हॅव नथिंग’ हे गाणे सादर केले.
  • तसेच गतवर्षीची विजेती मेक्सिकोची व्हॅनेसा पॉन्स द लिऑन हिने तिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवला.
  • टोनी सिंह ही जमैकाची चौथी विजेती आहे यापूर्वी तिच्या देशाला 1963, 1973, 1993 या वर्षी विजेतेपद मिळाले होते.
  • फ्रान्सची ऑफले मेझिनो ही उपविजेती,तर भारताची सुमन राव तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

इंग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळांना आंध्रात कायदेशीर संरक्षण :

  • आंध्र प्रदेशात सर्व सरकारी शाळांचे रूपांतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आंध्र प्रदेश शिक्षण कायदा 1982 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडले जाणार आहे.
  • पहिली ते सहावी या वर्गांसाठी शाळांमधून इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम राहील असा निर्णय राज्य सरकारने अलीकडेच घेतला होता. त्यात तेलुगु ही मूळ भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून काढून टाकण्याचा निर्णय 2020-21 या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. पण तेलुगु व उर्दू हे भाषा विषय मात्र सक्तीचे राहणार आहेत.
  • तसेच इंग्रजी माध्यमातून शिक्षणाच्या या निर्णयाला विरोध झाला होता पण मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी आता या निर्णयाला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी विधानसभेत दुरुस्ती विधेयक मांडण्याचे ठरवले आहे.

FAS Tag नव्या वर्षात होणार लागू :

  • टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
  • 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्यानं केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
  • नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, ज्यांनी फास्टॅग घेतलेलं नाही. त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे.
  • राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यांवर वाहनधारकांना मोठ्या रांगांचा सामना करावा लागत होता. या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना तयार केली होती.
  • ‘वन नेशन वन फास्टॅग’ असं या योजनेचं नाव आहे. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती.
  • मात्र, फास्टॅगचा तुटवढा निर्माण झाल्यानं केंद्रानं फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सम्मेद शेटे बनला कोल्हापूरचा पहिला बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर :

  • मलेशिया मधील पिनांग हेरीटेज सिटी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापुरच्या सम्मेद शेटेने आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठीची पात्रता पूर्ण केली आहे.
  • तर याचसोबत सम्मेदने स्पर्धेत नऊ पैकी सात गुण मिळवून तिसरा क्रमांकही पटकावला. त्यामुळे सम्मेद कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे.
  • बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्म बुद्धिबळ स्पर्धेत खेळल्यानंतर ठराविक आवश्यक कामगिरी करावी लागते. तीन नॉर्म व 2400 आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा टप्पा पार करणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) बहाल करण्यात येतो.
  • तसेच सम्मेदने 2400 गुणांकनाचा टप्पा सहा महिन्यापूर्वीच पार केला होता. गतवर्षीच्या दिल्ली ग्रँडमास्टर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत सम्मेदचा पहिला नॉर्म झाला त्यानंतर रशिया मधील एरोफ्लोट आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा नॉर्म कमविला व अंतिम तिसरा नॉर्म शुक्रवारी कमावत सम्मेदने आपल्या आंतरराष्ट्रीय मास्टर किताबावर शिक्कामोर्तब केलं.

मनरेगाचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्ह्याला जाहीर :

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत सन 2018-19 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • तर या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात 19 ते 20 डिसेंबरला होणार आहे.
  • सन 2018-19 या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी मनरेगा आयुक्तालय नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
  • तर महाराष्ट्र राज्यातून सदर पुरस्कारासाठी अमरावतीसह यवतमाळ, गोदिंया, गडचिरोली या चार जिल्ह्यांचे नामांकण सादर करण्यात आले होते. त्यानुसार दिल्ली येथे अवार्ड समितीसमोर सादरीकरणासाठी जिल्ह्याची निवड करून बोलविण्यात आले होते.
  • त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी अंमलबजावणीचे सादरीकरण २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केले होते.
  • तसेच त्या आधारे केंद्र सरकारच्या चमूने 7 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चिखलदारा, चांदूर बाजार या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.

RBIच्या नियमात मोठा बदल :

  • लाखो रुपये पाठवण्याचे (ट्रान्सफर) चांगले माध्यम असलेल्या NEFTच्या नियमांत RBIनं मोठा बदल केला असून, त्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.
  • तसेच आरबीआयनं केलेल्या या बदलामुळे ग्राहकांना नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) सुविधा आता 24 तास मिळणार आहे.
  • तर आता ग्राहकांना आठवड्यातील सात दिवसांमध्ये कधीही पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करता येणार आहेत. NEFT या सुविधेचा एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे पाठवण्यासाठी वापर केला जातो.
  • एनईएफटीमधून (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फण्डस् ट्रॉन्सफर) काही ठराविक काळात ऑनलाइन पद्धतीनं पैसे ट्रान्सफर केले जातात. NEFTद्वारे तुम्ही 2 लाखापर्यंत रोख रक्कम दुसऱ्याच्या अकाऊंटमध्ये पाठवू शकता. सद्यस्थितीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत NEFT द्वारे पैसे पाठवण्यात येत आहेत.
  • तर पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 पर्यंतच NEFT चा वापर करता येतो. मात्र आता या सुविधेची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्राहकांना दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस केव्हाही एका खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवणं सहजसोपं होणार आहे.
  • आरबीआय NEFT आणि RTGS द्वारे पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. तर IMPS द्वारे आताही बँकेतून पैसे पाठवताना ठराविक रक्कम घेतली जाते. तसेच IMPS द्वारे फक्त काही ठराविक रक्कमच ट्रान्सफर करता येते. तर RTGS द्वारे आपण मोठी रक्कम ट्रान्सफर करु शकता. मात्र आता NEFT सुविधा ग्राहकांना 24 तास घेता येणार आहे. त्यामुळे पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांसमोरील अडचणी दूर होणार आहे

दिनविशेष :

  • 16 डिसेंबर 1497 मध्ये वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
  • अमेरिकन राज्यक्रांती 16 डिसेंबर 1773 मध्ये बॉस्टन टी पार्टी.
  • 16 डिसेंबर 1854 मध्ये भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
  • 16 डिसेंबर 1946 मध्ये थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर 16 डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्राला समर्पित.
  • 16 डिसेंबर 1911 मध्ये पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2019)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago