16 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

16 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 डिसेंबर 2022)
शक्तिशाली ‘अग्नि-5’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
- भारताने शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘अग्नि-5’ या शक्तीशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
- आता हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करण्यास सक्षम आहे.
- तब्बल पाच हजार किलोमीटर पेक्षा अधिक दूरचे लक्ष्य भेदण्याची यामध्ये क्षमता आहे.
- पहिल्यांदाच हे क्षेपणास्त्र त्याच्या पूर्ण अंतरावर डागण्यात आले.
- ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रात ही चाचणी घेण्यात आली.
- याशिवाय, नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार ते आठ हजार किलोमीटर पर्यंत आहे.
- अग्नि 5 क्षेपणास्त्राची उंची 17 मीटर आहे, 50 टन वजनाचे हे क्षेपणास्त्र 1.5 टन पर्यंत अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
- याशिवाय ध्वनीच्या 24 पेट वेगाशी हे क्षेपणास्त्र स्पर्धा करू शकते.
- इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल(ICBM) अग्नि-5 शिवाय, अग्नि शृंखलेत भारतीय शस्त्रागारात अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3 , अग्नि-4 आणि पृथ्वी या क्षेपणास्त्राचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):
अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रतीक्षा :
- अखंड आणि स्वच्छ ऊर्जेसाठी अणू केंद्रक संयोगातून (न्यूक्लिअर फ्युजन) ऊर्जानिर्मिती महत्त्वाची आहे.
- अणू केंद्रक संयोगाचा अमेरिकेत यशस्वी झालेला प्रयोग ही त्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे.
- या प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती शक्य असल्याचे दिसून येत असले, तरी त्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- सूर्याच्या गर्भात सुरू असलेल्या ‘अणू केंद्रक संयोग’ या प्रक्रियेची प्रयोगशाळेत पुनरावृत्ती करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करण्यात अमेरिकेतील कॅलिफोर्निया लॉरेन्स लिव्हरमूर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आले.
- गेली काही दशके अणू केंद्रक संयोगाबाबत जगभरात मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू असताना अमेरिकेतील प्रयोगामुळे अणू केंद्रक संयोगातून ऊर्जानिर्मिती आता दृष्टिक्षेपात आल्याचे मानले जात आहे.
नागपूरनिर्मित राफेल विमानाच्या सुटय़ा भागांचा फ्रान्सला पुरवठा :
- राफेल या युद्ध विमानाच्या पाच वेगवेगळय़ा भागांची निर्मिती नागपूरच्या मिहानमधील कारखान्यात केली जात आहे.
- हे सुटे भाग केवळ भारतासाठी नव्हे तर जगभरातील राफेल विमानासाठी वापरण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत जेन मार्क सेरे शेव्हरले यांनी दिली.
- माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत त्यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील व्यापारसंबंध, गुंतवणूक यावर सविस्तर चर्चा केली.
- मिहानमध्ये दसॉल्त रिलायन्स एअरोस्पेस लि.चा कारखाना आहे. दसॉल्त एव्हीएशन (फ्रान्स) आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लि.(इंडिया) यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
- येथे राफेलचे कॉकपीट तयार होत असल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, राफेलचे वेगवेगळे पाच भाग तयार केले जात आहे.
- ते सुटे भाग फ्रान्सला पाठवले जातात. तसेच इतर ठिकाणांहून या विमानाचे सुटे भाग फ्रान्सला आणले जातात. त्यानंतर तेथे विमानाची बांधणी केली जाते.
अय्यरची बॅट तळपली :
- भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
- या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभारला.
- भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले.
- श्रेयस अय्यर आपले अर्धशतक झळकावताना विराट आणि सूर्याला मागे टाकताना एक खास पराक्रम केला आहे.
- श्रेयस अय्यरने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावाच 86 धावांची शानदार खेळी केली.
- त्याने आपल्या खेळीत 192 चेंडूचा सामना करताना 10 चौकार लगावले.
- दरम्यान, श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांसारख्या सहकारी फलंदाजांना मागे टाकले आहे.
- तो 2022 मध्ये खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
दिनविशेष :
- 16 डिसेंबर 1497 मध्ये वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
- अमेरिकन राज्यक्रांती 16 डिसेंबर 1773 मध्ये बॉस्टन टी पार्टी.
- 16 डिसेंबर 1854 मध्ये भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
- 16 डिसेंबर 1946 मध्ये थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर 16 डिसेंबर 1985 मध्ये राष्ट्राला समर्पित.
- 16 डिसेंबर 1911 मध्ये पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.