16 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 फेब्रुवारी 2019)
पंतप्रधान मोदी यांची घोषणा; लष्कराला सर्वाधिकार:
- काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या निर्घृण हल्ल्याला कधी, कुठे आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे, याचे सर्वाधिकार लष्कराला दिले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाशी येथे जाहीर सभेत केले.
- तर हा हल्ला आम्ही विसरणार नाही आणि हल्लेखोरांना क्षमाही करणार नाही, असा इशारा केंद्रीय राखीव पोलीस दलाने दिला आहे.
- तसेच या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानची आर्थिक आणि राजनैतिक कोंडी करण्याची व्यूहरचनाही भारताने हाती घेतली आहे. या हल्ल्याची माहिती देण्यासाठी सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
- पाकिस्तानला दिलेला ‘विशेष प्राधान्य देश’ (मोस्ट फेव्हर्ड नेशन – एमएफएन) हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने पाकिस्तानला दणका दिला आहे.
- तर याबरोबर जैश-ए-महम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीला चीनने स्पष्ट विरोध केला असला तरी मुत्सद्दी पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत.
आता पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक शुल्कात वाढ:
- नागपूर आणि मुंबई पाठोपाठ पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही दस्त नोंदणीवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता आठ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मुद्रांक शुल्कात झालेल्या वाढीचा परिणाम घरांच्या किमतीवर होणार आहे.
- सध्या पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये दस्त नोंदणीवर 5 टक्के मुद्रांक शुल्क आणि 1 टक्का एलबीटी भरावा लागत होता. त्या व्यतिरिक्त 30 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर आणखी एक टक्का म्हणजेच जास्तीत जास्त 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागत होते.
- तर तीस लाखांच्या वरील व्यवहारावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क 30 हजारच कायम राहत होते. मेट्रो प्रकल्पासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आणखी एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क आकारण्यास राज्य सरकारकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
- तसेच यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर आता एकूण 7 टक्क्यांऐवजी (नोंदणी शुल्क धरून) आठ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. आठ फेब्रुवारीपासून यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आले आहेत.
जावेद अख्तर यांचा पाकिस्तान दौरा रद्द:
- पुलवामा येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे.
- तर याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपला कराची दौरा रद्द केला आहे.
- कराची आर्ट कॉन्सिलकडून जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारलं होतं. यासाठी दोन दिवसांचा कराची दौरा दोघंही करणार होते.
- पण पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या दोघांनीही पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम 23 आणि 24 फेब्रुवारीला होणार आहे.
रेल्वेचा मासिक पास आता मोबाइल अॅपवर:
- रेल्वेने अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांना आता मासिक पास रेल्वे स्थानकात, तिकीट खिडकीवर जाऊन काढण्याची गरज नाही.
- मोबाइल अॅपवर ऑनलाइन पास मिळण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. या शिवाय रेल्वे हुकली किंवा प्रवासाचा बेत रद्द झाला तरी आता काढलेल्या तिकिटाचा भुर्दंड पडणार नाही.
- रेल्वे तिकीटही आता हस्तांतरणीय होणार आहे. प्रवासी हा केंद्र बिंदू मानून रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार प्रवासी हिताचे हे निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतले असल्याची माहिती मुंबई क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी दिली.
- रेल्वेनु सुरू केलेल्या या सुविधेमुळे अप-डाऊनच्या धावपळीत असणाऱ्या चाकरमान्यांना मासिक पास मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. या शिवाय प्रशासनाने रेल्वे आरक्षण तिकीट आता हस्तांतरित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर यानुसार रेल्वे प्रवाशाला आई-वडील, भाऊ, बहीण, पती पत्नी या आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर आरक्षण तिकीट हस्तांतर करता येणार आहे. त्यासाठी तिकीटाची प्रिंट काढून घ्यावी लागणार आहे.
दिनविशेष:
- जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1222 रोजी झाला होता.
- सन 1659 मध्ये पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
- 1704 या साली औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले होते.
- बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1822 मध्ये झाला.
- भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1876 रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा