16 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2020)
गेल्या 24 तासांत 67,708 जणांना करोनाचा संसर्ग:
गेल्या 24 तासांत 67,708 जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या 73 लाखांहून अधिक झाली आहे.
आतापर्यंत 63 लाख 83 हजार 441 रुग्ण बरे झाल्याने, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी 87.35 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
करोनाबाधितांची एकूण संख्या गुरुवारी 73,07,097 इतकी झाली, तर 24तासांत 680 जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा1 लाख 11 हजार 266 झाला आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून 1.52टक्क्य़ांवर आली आहे.
एकूण रुग्ण किती? : देशात सध्या करोनाचे 8,12,390 रुग्ण असून, ही संख्या एकूण करोनाबाधितांच्या 11.11टक्के आहे.
पेन्शन फंडानं पाच लाख कोटींचा टप्पा पार केल्याची घोषणा:
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आज गुंतवणूक करण्यात आलेल्या एकूण रक्कमे अंतर्गत (असेट अँडर मॅनेजमेंट) पाच लाख कोटींचा टप्पा पार केल्याची घोषणा केली आहे.
या आकड्यामध्ये सदस्यांनी नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत12 वर्षांच्या कालावधीत संयुक्तपणे योगदान दिले आहे.
शासकीय विभागांमधील 70.40 लाख कर्मचाऱ्यांनी व अशासकीय विभागांमधील 24 .24लाख कर्मचारी या योजनेचे सदस्य झाले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी- ख्रिस गेलनेमोलाचं योगदान दिलं:
लागोपाठ पराभवांमुळे गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अखेरीस विजयी सूर गवसला आहे.
शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबने RCB वर 8 गडी राखून मात केली.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या ख्रिस गेलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गेलने 45चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 53 धावा केल्या.
दिनविशेष
16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्क ब्रिटिशांना विकले.
भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.