16 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
16 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2022)
जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण :
- जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) भारताची 107व्या स्थानी घसरण झाली आहे.
- 29.1 गुण असलेल्या भारताला ‘गंभीर’ श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहे.
- भारताचे शेजारी पाकिस्तान (99), बांगलादेश (84), नेपाळ (81) आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका (64) या सर्वाची स्थिती अधिक चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- या निर्देशांकात 2021 साली भारताचे 116देशांमध्ये 101वे स्थान होते.
- यंदा 121 देशांमध्ये भारत 107व्या स्थानापर्यंत खाली घसरला आहे.
- आशियातील केवळ अफगाणिस्तान (109) हा देशच भारताच्या मागे आहे.
- या यादीत चीन, कुवेत या आशियातील देशांसह 17 देश सर्वोच्च स्थानी आहेत. तर येमेन 121 स्थानी आहे.
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्राच्या सुपुत्राने सुवर्ण पदकासह मिळवला ऑलिम्पिक कोटा :
- भारताचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला.
- जागतिक चॅम्पियनशिपच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत महान अभिनव बिंद्रानंतर ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय नेमबाज ठरला आहे.
- 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवणारा तो दुसरा भारतीय नेमबाज आहे.
- अठरा वर्षीय रुद्राक्षने सुवर्णपदकाचा सामना गमावल्यानंतर पुनरागमन करत इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला.
- यंदाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिकसाठी चार कोटा जागा उपलब्ध आहेत.
- भारताने नुकताच क्रोएशियातील शॉटगन जागतिक नेमबाजी स्पर्धेमधील पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत भावनीश मेंदिरट्टाच्या माध्यमातून पहिला कोटा मिळवला.
आशिया चषक विजेते ठरलेल्या भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव :
- बांगलादेशातील सिल्हेट येथे संपन्न झालेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ गडी राखत दारूण पराभव केला.
- कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022चा आशिया जिंकत सातव्यांदा नाव कोरले.
- स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला.
- अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दिनविशेष :
- 16 ऑक्टोबर 1868 मध्ये डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्क ब्रिटिशांना विकले.
- भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश 16 ऑक्टोबर 1905 मध्ये दिला.
- 16 ऑक्टोबर 1978 मध्ये माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.
- 16 ऑक्टोबर 2003 मध्ये नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.