16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2020)
अवनी दोशी बुकर पुरस्काराच्या लघुयादीत:
- यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे.
- यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.
- पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नाही.
- अवनी दोशी या अमेरिकेत जन्मल्या असून सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधील संघर्षपूर्ण नातेसंबंधांची गोष्ट सांगते.
- दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले.
- तिस्ती नॅगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे. स्टुअर्ट यांची शगी बेन ही कादंबरी पुरस्काराची दावेदार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात गेले कित्येक दिवस सुरू आहे.
- बुकर पुरस्कार हा पन्नास हजार पौंडाचा असून तो 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायल:
- करोना हे फक्त भारतातलंच नाही तर जगापुढचं आरोग्य संकट झालं आहे. अशात करोना व्हायरसचा प्रतिबंध करणाऱ्या लशींवर काम सुरु आहे.
- भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
- कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
- तर सिरम इन्स्टिट्युटने फेज 2 B3 चाचणी पूर्ण केली आहे. सिरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे अशी माहितीही डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
केंद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद:
- केंद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
- 20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.
- तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
- स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे.
- नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं 2016 पासून 34 कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे.
- यापैकी 8 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य 6 कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.
- याव्यतिरिक्त 20 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.
माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन:
- माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
- ते 87 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
- सदाशिव यांचा जन्म कसबा ठाणे ( त. पन्हाळा ) येथे 10 ऑक्टोबर 1933 मध्ये सधन शेतकरी कुटुंबात झाला.
- सदाशिव यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली.
- इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थ स्टॅपोर्डशायर, नॅन्टविच या क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दुहेरी बाजूने ठसा उमटवला.
- 2017 मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- डिसेंबर 1955 मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची प्रथमच निवड करण्यात आली होती.
दिनविशेष :
- 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो.
- निसर्ग कवी, शेतकरी, आमदार अशी ओळख असलेले प्रख्यात “ना.धों. महानोर” (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला.