16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
16 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2020)
अवनी दोशी बुकर पुरस्काराच्या लघुयादीत:
यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे.
यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.
पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नाही.
अवनी दोशी या अमेरिकेत जन्मल्या असून सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधील संघर्षपूर्ण नातेसंबंधांची गोष्ट सांगते.
दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले.
तिस्ती नॅगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे. स्टुअर्ट यांची शगी बेन ही कादंबरी पुरस्काराची दावेदार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात गेले कित्येक दिवस सुरू आहे.
बुकर पुरस्कार हा पन्नास हजार पौंडाचा असून तो 17 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
करोना हे फक्त भारतातलंच नाही तर जगापुढचं आरोग्य संकट झालं आहे. अशात करोना व्हायरसचा प्रतिबंध करणाऱ्या लशींवर काम सुरु आहे.
भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
तर सिरम इन्स्टिट्युटने फेज 2 B3 चाचणी पूर्ण केली आहे. सिरमने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे अशी माहितीही डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.
केंद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद:
केंद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.
तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे.
नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं 2016 पासून 34 कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे.
यापैकी 8 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य6 कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.
याव्यतिरिक्त 20 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.
माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन:
माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते 87 वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
सदाशिव यांचा जन्म कसबा ठाणे ( त. पन्हाळा ) येथे 10 ऑक्टोबर 1933 मध्ये सधन शेतकरी कुटुंबात झाला.
सदाशिव यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली.
इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थ स्टॅपोर्डशायर, नॅन्टविच या क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दुहेरी बाजूने ठसा उमटवला.
2017 मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
डिसेंबर 1955 मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची प्रथमच निवड करण्यात आली होती.
दिनविशेष :
16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो.
निसर्ग कवी, शेतकरी, आमदार अशी ओळख असलेले प्रख्यात “ना.धों. महानोर” (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.