17 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 एप्रिल 2020)
अमेरिकेसह 55 देशांना भारत करणार ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा :
करोनानं जगभरात थैमान घातलं आहे. अशातच करोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वच देश शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत भारतही अनेक देशांच्या मदतीला धावून गेला आहे.
अमेरिकेसह 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे.
जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे.
तर सरकारनं 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान या कालावधीत विमानांच्या उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच लॉकडाउनच्या काळात ज्या प्रवशांनी विमानांच तिकिट आरक्षित केलं होतं त्यांना संपूर्ण रक्कम रिफंड करण्याऐवजी कंपन्यांनी नवी तारीख निवडण्यास सांगितलं होतं.
परंतु सरकारनं एक पत्रक काढून या कालावधीत तिकिट आरक्षित करण्यात आलेल्या प्रवाशांचे पैसे परत करण्याचे आदेश विमान कंपन्यांना दिले आहेत.
परंतु ज्या प्रवाशांनी 24 मार्च किंवा त्या पूर्वी म्हणजेच लॉकडाउन पूर्वी तिकिटं आरक्षित केली आहेत त्यांना रिफंड मिळणार नसून ज्यांनी 25 मार्च नंतर ज्यांनी तिकिटं आरक्षित केली त्यांनाच रिफंड देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर ‘रासुका’खाली कारवाई :
उत्तरप्रदेशात करोना विषाणूविरुद्धच्या लढय़ात कर्तव्य बजावणारे पोलीस, तसेच आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
करोनाबाबतच्या आढावा बैठकीत गुरुवारी हे निर्देश देतानाच, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना मालमत्तेचे नुकसान भरून द्यायला लावावे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
तर अशा लोकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आणि भारतीय दंड संहितेनुसारही कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका आहे अशी अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास त्याला कुठलाही आरोप न ठेवता 12 महिन्यांपर्यंत कैदेत ठेवण्याचा अधिकार कठोर अशा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये देण्यात आला आहे.
करोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनात 6 भारतीय कंपन्या सहभागी :
जगभरात झपाटय़ाने पसरणाऱ्या कोविड-19 विषाणूच्या संसर्गासाठी लवकरात लवकर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असून, सहा भारतीय कंपन्याही त्यात सहभागी झाल्या आहेत.
सुमारे 70 ‘व्हॅक्सिन कँडिडेट्स’ची चाचणी करण्यात येत असून, त्यापैकी किमान तीन मानवावरील नैदानिक चाचणीच्या (क्लिनिकल ट्रायल) टप्प्यावर पोहचल्या आहेत.
तर झायडस कॅडिला कंपनी दोन लसींवर काम करत आहे, तर सेरम इन्स्टिटय़ूट, बायोलॉजिकल ई., भारत बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि मिनव्ॉक्स या कंपन्या प्रत्येकी एक लस विकसित करत आहे’, असे फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक गगनदीप कांग यांनी पीटीआयला सांगितले.
दिनविशेष:
17 एप्रिल हा दिवस ‘जागतिक हिमोफिलिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
हिंदी कवी तसेच थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य ‘संत सूरदास’ यांचा जन्म 17 एप्रिल 1478 मध्ये झाला.
बेसबॉल चे जनक ‘अलेक्झांडर कार्टराईट’ यांचा जन्म 17 एप्रिल 1820 रोजी झाला होता.
बॅ. मुकुंदराव जयकरसन 1950 मध्ये पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले होते.
सन 1952 मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
सन 1971द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.