17 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs
17 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2021)
पुढच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस धावणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.
- तर मुख्यत्वे मोदींनी यावेळी 75 वंदे भारत ट्रेन 75 आठवड्यांत देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडणार आहे अशी घोषणा केली.
- सध्या वंदे भारत एक्सप्रेस देशातील दोन मार्गांवर धावत आहे. वंदे भारत सेमी हाय स्पीड ट्रेन मेक इन इंडिया धोरणांतर्गत बनवल्या जात आहेत आणि त्या 90 टक्के स्वदेशी आहेत.
- पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान चालवण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश :
- देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
- तर 27 सप्टेंबरपासून शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरु केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
- तसेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत शिक्षणावर केलेल्या कामांबद्दल माहिती दिली.
- प्रत्येक मुलामध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आणि त्यांना राष्ट्रासाठी सर्वस्व देण्यास तयार करणे हा उद्देश आहे.
14 ऑगस्ट आता ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ दिवस म्हणून ओळखला जाणार :
- संपूर्ण देशभरात भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
- देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.
लॉर्ड्सवर भारताची सत्ता :
- दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली.
- तर आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडपुढे विजयासाठी 60 षटकांत 272 धावांचे आव्हान ठेवले.
- मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत 151 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
- शमीने कारकीर्दीतील झुंजार अर्धशतकी खेळी साकारताना जसप्रित बुमराच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात 8 बाद 298 अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेले.
दिनविशेष:
- सन 1666 मध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
- श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म 17 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
- 17 ऑगस्ट 1909 हा दिवस क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांचे स्मृतीदिन आहे.
- ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1916 मध्ये झाला.