17 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
17 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 डिसेंबर 2021)
‘मेट्रोमॅन’ ई श्रीधरन वर्षभरातच घेतला सक्रीय राजकारणातून संन्यास :
- मागील केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित झालेले आणि मेट्रोमॅन अशी ओळख असलेल्या ई श्रीधरन यांनी मोठा निर्णय घेतला.
- तर त्यांनी सक्रीय राजकारणातून संन्यास घेत असल्याचं काल जाहीर केलं.
- तसेच श्रीधरन देशातील पहिली मेट्रो कोलकात्यात सुरू करण्यात प्रमुख भूमिका निभावली होती.
- श्रीधरन यांनी आपल्या मलाप्पुरम या ठिकाणी माध्यमांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
Must Read (नक्की वाचा):
व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड :
- मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्यापासून ते प्रथमच मतदारांची नावनोंदणी सुलभ करण्यापर्यंत, मंत्रिमंडळाने बुधवारी काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणांना मंजुरी दिली.
- तर निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला दिलेल्या अनेक सूचनांमध्ये एकच मतदार यादी आणि दूरस्थ मतदान या सुधारणांचाही समावेश आहे.
- तसेच मतदार ओळखपत्रांसह आधार लिंकिंगला ऐच्छिक आधारावर परवानगी दिली जाईल.
- मतदार यादी तयार करण्यासाठी आधार डेटा गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रस्तावित केलेली ही एक महत्त्वाची सुधारणा होती.
- तर काही अधिकाऱ्यांच्या मते, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 आणि आधार कायदा, 2016 मधील सुधारणांमध्ये ही सुधारणा दिसून येईल.
- नवीन प्रस्तावानुसार, सूत्रांनी सांगितले की, प्रथमच मतदारांची नावनोंदणी वर्षातून चार वेळा केली जाईल.
जनरल नरवणे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी :
- भारताचे पहिले संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) बिपिन रावत यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा जुनी व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे.
- तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांमध्ये वरिष्ठ असणारे जनरल नरवणे यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- तर तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम त्यांच्याकडे असणार आहे.
- भारतीय लष्कर दलाचे प्रमुख एम एम नरवणे सर्वात वरिष्ठ असून त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली आहे.
- त्यामुळे मोदी सरकारने संरक्षण दल प्रमुख हे पद आणण्याआधी ज्या पद्धतीने काम सुरु होतं तसंच काम सध्या सुरु राहणार आहे.
मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय 18 वरुन 21 वर्षे होणार :
- केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. - मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, 1955 सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल.
- तसेच ही मंजुरी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर 2020 मध्ये नीति आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे.
- तर या आयोगाची स्थापना मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी, माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता, पोषण सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी करण्यात आली होती.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धात सिंधू, श्रीकांत यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश:
- गतविजेत्या पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगला सरळ गेममध्ये पराभूत करत स्पेनमध्ये सुरू असलेल्या जागतिक र्अंजक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
- तर सहाव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना 21-14, 21-18 असा जिंकला.
- जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानी असलेल्या चोचूवाँगवरील सिंधूचा हा पाचवा विजय ठरला.
- सिंधूला यावर्षी ऑल इंग्लंड र्अंजक्यपद आणि जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यात चोचूवाँगकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड करण्यातही तिला यश आले.
दिनविशेष:
- देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्ष ‘लालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
- भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
- जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- 2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.