17 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 डिसेंबर 2022)
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज दोन आठवडे बंद :
सर्वोच्च न्यायालयाला 17 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 पर्यंत हिवाळी सुट्टी असून या कालावधीत खंडपीठांचे कामकाज होणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सांगितले.
केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी, न्यायालयांच्या दीर्घ कालावधीच्या सुट्टय़ा सोयीच्या नाहीत, अशी लोकभावना आहे, असे राज्यसभेत गुरुवारी म्हटले होते.
त्या अनुषंगाने सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या सुट्टीसंदर्भात केलेल्या घोषणेला विशेष महत्त्व आहे.
खंडपीठांचे कामकाज 17 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 अशी माहिती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयात उपस्थित वकिलांना दिली.
तथापि, नियुक्त केलेल्या सुट्टीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोन आठवडय़ांच्या हिवाळी सुट्टीतही तातडीचे नवे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
नीरज चोप्रा अथलेटिक्स विश्वातील कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही.
यावर्षी त्याच्या खात्यात आणखी एक मोठा विक्रम जमा झाला आहे.
2022 मध्ये नीरज चोप्रांवर सर्वाधिक लेख लिहिले गेले आहेत. या प्रकरणात त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंना मागे सोडले.
नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि असे करणारा तो पहिला अॅथलीट ठरला होता.
त्याच वेळी, त्याच वर्षी डायमंड लीग जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरला.
एकामागून एक ऐतिहासिक विजय मिळवून तो आता जगातील खेळाडूंबद्दल सर्वाधिक लिहिला जाणारा खेळाडू बनला आहे.
भारताच्या नीरज चोप्राने उसेन बोल्टला मागे टाकल्याची बातमी जागतिक अॅथलेटिक्सने ग्लोबल इंटरेस्टटेड चार्ट प्रकाशित केल्यावर आली.
उसेन बोल्ट वर्षांमध्ये प्रथमच ऍथलीट्सबद्दल सर्वाधिक लिहिल्या गेलेल्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
2022 मध्ये भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्राने करिष्माई बोल्टची जागा घेतली आहे, तर उसेन बोल्टने 2017 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये विश्वविक्रम केला आहे असे जागतिक ऍथलेटिक्सने नीरज चोप्रा यांच्या संदर्भात म्हटले आहे.
यादीनुसार पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय स्टार खेळाडू नीरज चोप्रा यांच्यावर 812 लेख लिहिले गेले आहेत.
यानंतर, जमैकाची अॅथलीट इलेन थॉम्पसन-हेरा दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांच्यावर 751 लेख लिहिले गेले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शेली अॅन फ्रेझरवर 698 लेख लिहिले गेले आहेत.
कुलदीपने रचले विक्रमांचे मनोरे :
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्यादा फलंदाजांनी यजमानांना अडचणीत आणले.
404 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 150 धावांवर गारद झाला.
गोलंदाजीत कुलदीप यादवने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने एकूण 5 फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
या शानदार कामगिरीनंतर त्याने भारताचा माजी दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला आहे.
बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या एका पाच आणि त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव सातवा गोलंदाज आहे.
या यादीत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठान सर्वात तो पुढे आहे. त्याने तीन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
त्याचबरोबर झहीर खाने हा कारनामा दोन वेळा केला आहे.
त्याचबरोबर आर. आश्विन, सुनील जोशी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि कुलदीप यादवने एकदा हा कारनामा केला आहे.
चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियन भूमीवर टी20 क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम:
बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी ॲडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर्सयांच्यात महत्त्वाचा सामना झाला.
पहिल्या सामन्यातील रोमहर्षक विजयानंतर सिडनी थंडर्स सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला.
पण ॲडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी त्याच्यासोबत मोठा खेळ केला.
ॲडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरला अवघ्या 15 धावांत गुंडाळले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट हे अतिशय आक्रमक आणि मजबूत क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जाते.
दिनविशेष:
देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्ष ‘लालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.