17 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2019)
भारतातातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तुंवरील कस्टम ड्युटीत 200 टक्के वाढ:
- पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला निर्यात करणाऱ्या करण्यात येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के कस्टम ड्युटी आकारली आहे.
- तर पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला जास्त किंमत चुकवावी लागणार आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.
- भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो.
- आता या वस्तूंवरची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.
- तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे
Must Read (नक्की वाचा):
सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद :
- आसाम येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे.
- तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला 21-18 21-5 असे पराभूत केले.
- या स्पर्धेतील सायनाचा हा जेतेपदाचा चौकार ठरला आहे. यापूर्वी तीन वेळा सायनाने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
- या स्पर्धेतील सायनाचे हे चौथे जेतेपद आहे. यापूर्वी सायनाने 2006, 2007 आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते.
- तर लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूने 2013 साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
- राष्ट्रीय स्पर्धेत 2013 साली सिंधूने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर सिंधूला एकदाही राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही.
विराट कोहलीने स्थगित केला पुरस्कार सोहळा :
- पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतामध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही RP-SG इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स (भारतीय क्रीडा सन्मान) हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला
आहे. - या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षापासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती.
- या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतश्वर पुजारा, महान महिला बॉक्सर मेरी कॉम आणि भारतातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यांना सन्मानित करण्यात येणार होते.
- तसेच या पुरस्कारांतील सर्वोत्तम महिला खेळाडू या विभागासाठी स्मृती मानधना, मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंना नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघाची गोलरक्षक सविता पुनियाच्या
नावाचाही समावेश करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी हिमा दास आणि स्वप्ना बर्मन यांनाही नामांकन देण्यात आले होते.
सौरऊर्जेने 90 दिवस उड्डाण करेल हा ब्रिटिश ड्रोन :
- ब्रिटनची मॅपिंग एजन्सी ऑर्डनन्स सर्व्हेने एकाच उड्डाणात पृथ्वीच्या प्रत्येक भागाचे छायाचित्र घेण्यास सक्षम असेल.
- तर सौरऊर्जेच्या साहाय्याने हा ड्रोन 67 हजार फूट उंचीवर सलग 90 दिवस उड्डाण करू शकेल.
- तसेच याद्वारे घेतलली छायाचित्रे विज्ञान संस्थेशी संबंधित संस्था व व्यवसायांना विक्री केली जातील.
- हा ड्रोन 150 किलोग्रॅम वजनाचे असून त्याचे पंख 40 मीटर लांबीचे आहेत. मॅपिंगसाठी सर्वोत्तम ड्रोन असल्याचे ऑर्डनन्स सर्व्हेचे म्हणणे आहे.
शिवछत्रपती पुरस्कार निर्णयात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही:
- नेहमीप्रमाणे यंदाही राज्याचा सर्वांत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वादामध्ये अडकला. या पुरस्कारासाठी आपल्या नावाची निवड न झाल्याने आर्टिस्टीक जिमनॅस्ट अक्षता वावेकर हिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
- मात्र तिची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. ‘या पुरस्काराची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने झालेली असल्याने यामध्ये कोणताही गैरप्रकार
झाल्याची शक्यता नाही. - शिवछत्रपती पुरस्कार अंतिम निवड समितीमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य व पॅराऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य यांचा समावेश होता.
- तर गेल्या चार वर्षांपासून या पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे.
दिनविशेष :
- 17 फेब्रुवारी 1927 मध्ये रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- कोसोव्हो देशाने 17 फेब्रुवारी 2008 मध्ये स्वातंत्र्य जाहीर केले.
- 17 फेब्रुवारी 1881 मध्ये क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
dear sir please calu ghadamodi 6 month che aasel tr pdf patva please