17 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 फेब्रुवरी 2020)
‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्याचा निर्णय :
दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तथा आबांचे स्मृतिस्थळ असलेले ‘निर्मल स्थळ’ वर्षभरात विकसित केले जाईल आणि सांगली येथील स्मारकाला यापूर्वी 9.71 कोटी रुपये मंजूर आहेत.
तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथे दिली.
तसेच अंजनी येथे आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिवादन केले.
स्वच्छता अभियानातील ‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्यात येणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. तर16 फेब्रुवारीला स्मार्ट व्हिलेज पुरस्कार वितरण होणार आहे.
अमेरिकेत लॉसएंजल्स येथे स्थापन करण्यात आलेल्या परदेशातील पहिल्या जागतिक योग विद्यापीठात यावर्षी एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
तर अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून भारताने योगप्रसारात मोठी भूमिका पार पाडण्याचे ठरवले आहे.
तसेच 21 जून हा दरवर्षी जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंद योग विद्यापीठ एकूण 50लाख डॉलर्स खर्चून उभारण्यात आले असून केस वेस्टर्न विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीनाथ व भारतीय योग गुरू एच. आर. नागेंद्र यांना या विद्यापीठाची सूत्रे देण्यात आली आहेत.
एप्रिलपासून प्रवेश सुरू होत असून ऑगस्ट 2020 पासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील. यात योगातील उच्चशिक्षणाचा समावेश असून या विद्यापीठाला कॅलिफोर्नियातील खासगी शिक्षण मंडळाने नोव्हेंबर 2019 मध्ये मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी केली राम मंदिराबाबत आणखी एक मोठी घोषणा :
राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एका मोठ्या निर्णयाची रविवारी घोषणा केली.
भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टकडे 67 एकर जमीन हस्तांतरीत करण्यात येईल अशी घोषणा मोदींनी केली आहे. वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली
तसेच अनेक वर्षांपासून वादग्रस्त जमीन म्हणून ओळखळी जाणारी अयोध्येतील राम जन्मभूमीची 67 एकर जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात होती. जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत ही जमीन केंद्राच्या ताब्यात राहिल, असा आदेश याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला होता.
आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच रामजन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्याने ही सर्व जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तर या संपूर्ण जागेवर आता भव्य राम मंदिराची स्थापना करण्यात येईल असे मोदींनी म्हटले आहे.
महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर होणार फास्टॅग :
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर या महिन्याच्या अखेरपर्यंत फास्टॅगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
फास्टॅगची सुविधा सुरू केल्यावर या सुविधेचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागेल, अशी योजना एमएसआरडीसीमार्फत तयार करण्यात येत आहे.
राज्याच्या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग लागू झाल्यावर जर फास्टॅग सुविधेचा वापर केला नाही, तर वाहनचालकाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे- वरळी सीलिंक मार्गावर फास्टॅग सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सध्या फास्टॅग नसलेल्या वाहनांना सीलिंक आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, ही सूट काही दिवसांपुरतीच असेल.वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा पाच ठिकाणी मुंबईच्या एंट्री पॉइंटवर टोल नाके आहेत, तर मुंबईमध्ये वांद्रे- वरळी सीलिंक या मार्गावरही टोल नाका आहे. या नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू केली आहे. पाच टोल नाक्यांवर अद्याप फास्टॅग सुविधा सुरू केलेली नाही.
जीएसटी रिटर्न भरण्यात महाराष्ट्र देशात अव्वल :
दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या देशातल्या 92 टक्के बड्या करदात्यांनी 2017-18 या आर्थिक वर्षातील वार्षिक रिटर्न्स भरले.
तर एक जुलै 2017 पासून देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायांना वार्षिक रिटर्न्स जीएसटीआर – 9 अंतर्गत दाखल करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तसेच उपलब्ध आकडेवारीनुसार पात्र बड्या करदात्यांपैकी 91.3 टक्क्यांनी 12 फेब्रुवारीपूर्वी रिटर्न्स भरले तर 92.3 पात्र करदात्यांनी 12 फेब्रुवारीपूर्वी सामंजस्य निवेदन दाखल केले. दोन कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांची संख्या देशात 12.42 लाख आहे. तार
पाठोपाठ गुजरात आणि राजस्थान (प्रत्येकी 95 टक्के) या राज्यांचा क्रमांक आहे. ज्या व्यावसायिक करदात्यांनी अद्याप याची पूर्तता केली नसेल त्यांना अजूनही रिटर्न भरता येईल, मात्र त्यासाठी त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल, असे स्प्ट करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प लोकप्रियतेत अव्वल :
फेसबुक या समाजमाध्यमावरील लोकप्रियतेत पहिला क्रमांक दिल्याबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकचे आभार मानले आहेत.
लोकप्रियतेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांचाही मोठा सन्मान झाला असल्याच्या भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या आहेत.
विशेष म्हणजे ट्रम्प हे भारताला भेट देण्याच्या अगोदर फेसबुकने हे दोन नेते लोकप्रियतेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते.
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर ट्रम्प लोकप्रियतेत क्रमांक एकवर असल्याचे म्हटले होते.
दिनविशेष:
पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.
स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.
क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.
1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.