17 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
17 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 फेब्रुवारी 2023)
दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते भारतात दाखल होणार:
- सहा महिन्यांपूर्वी नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले होते.
- त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते 18 फेब्रुवारी रोजी भारतात आणले जाणार आहेत.
- अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांची दुसरी तुकडी भारतात दाखल होणार आहे.
- दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या चित्त्यांच्या दुसऱ्या तुकडीमध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर:
- राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झाला आहे.
- तर ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन 2022च्या पुरस्कारांची घोषणा केली.
- यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.
- विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
- प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या 90 आहे.
- श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ
- तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख 2 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
- तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
आता आग्रा किल्ल्यावर साजरी होणार शिवजंयती:
- पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.
- आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी करता येईल, असं पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
- महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती.
- मात्र, त्यांना वारंवार परवानगी नाकारण्यात आली होती.
एअर इंडिया एकूण 870 विमानं खरेदी करणार:
- टाटा समूहाची मालकी असलेल्या एअर इंडिया कंपनीने दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस कंपन्यांसोबत करार करत 470 विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
- त्यानंतर आज पून्हा आणखी 370 विमानं घेणार असल्याचे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगतिले आहे.
- यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण 870 विमानं काही पुढील वर्षात दाखल होणार आहेत.
- एअर इंडियाने मंगळवारी फ्रांसच्या एअरबसकडून 250 तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून 220 विमाने घेणार आहे.
- हवाई वाहतूक क्षेत्रातलला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असा हा करार आहे.
संरक्षण क्षेत्रातील 75 टक्के खरेदी देशांतर्गत:
- संरक्षण क्षेत्रासाठी असलेल्या एकूण भांडवली खर्चाच्या तरतुदीपैकी, 2023-24 साली देशांतर्गत संरक्षण उत्पादकांकडून खरेदीसाठी भारत 75 टक्के रक्कम खर्च करेल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली.
- निरनिराळी शस्त्रे व इतर लष्करी साहित्य यांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
- 201 सामंजस्य करार, 53 महत्त्वाच्या घोषणा आणि नऊ उत्पादने बाजारात आणणे अशा 266 भागीदारींवर एअरो-इंडिया प्रदर्शनात शिक्कामोर्तब करण्यात आले.
- यातून संरक्षण क्षेत्रात सुमारे 80 हजार कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.
- सामंजस्य करारांमध्ये, हेलिकॉप्टर इंजिन्सचा आराखडा, विकास, उत्पादन आणि नेहमीसाठी देखरेख यांकरिता संयुक्त उपक्रमासाठी हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि. आणि फ्रान्सचे साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स यांच्यातील कराराचा समावेश आहे.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भारतातील संरक्षण उद्योगांतील उच्चपदस्थ नेते आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘बंधन’ कार्यक्रमात करार आणि सामंजस्य करार यांच्यावर औपचारिकरीत्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’:
- सध्या जगभरात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात OpenAI ChatGpt ची चर्चा सुरु आहे.
- OpenAI ने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेल्या ChatGpt चॅटबॉट आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे.
- यामध्ये भारतात देखील देशातील पहिला इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.
- भारतीय वित्तीय कंपनी Velocity ने देशातील पहिला ChatGPT इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.
- या कंपनीने या चॅटबॉटचे नाव Lexi असे ठेवले आहे.
- Velocity ने AI चा फायदा घेऊन सध्याच्या अॅनालिटिक्स टूल व्हेलॉसिटी इनसाइट्ससह ते एकत्रित करण्यात आले आहे.
- Velocity Insights वापरणारे भारतीय ई-कॉमर्स ब्रँड मेटा मालकीच्या WhatsApp वर दैनंदिन व्यावसायिक रिपोर्ट मिळवू शकतात.
- हे ई-कॉमर्स साइट्सना त्यांची व्यवसाय कार्ये विकसित करण्यास मदत करणार आहे.
दीप्ती शर्मा भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी बनली पहिली गोलंदाज:
- दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे सुरुवात झाली.
- सामन्यात अष्टपैलू खेळाडू भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्माने शानदार कामगिरी करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
- टी20फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे.
- तिने पूनम यादवचा 98 विकेट्सचा विक्रम मोडत 100 विकेट्स घेत नवीन विक्रमाची नोंद केली.
- सामन्यात एकाचा षटकात दोन विकेट्स घेत तिने नवीन विक्रम केला.
- आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे.
दिनविशेष:
- 17 फेब्रुवारी 1801: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
- 17 फेब्रुवारी 1927: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- 17 फेब्रुवारी 1933: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. 1920 साली ही दारुबंदी लागू झाली होती.
- 17 फेब्रुवारी 1964: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
- 17 फेब्रुवारी 1996: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
- 17 फेब्रुवारी 2008: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.