17 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

17 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 जानेवारी 2023)

कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात 10 वर्षांसाठी नोकरभरती बंद:

  • सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उत्तराखंड सरकारकडुन एक नवा नियम बनवण्यात आला आहे.
  • या नियमानुसार परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर कॉपी केली, तर त्या उमेदवाराला पुढील 10 वर्षांसाठी बॅन करण्यात येईल.
  • म्हणजेच त्या उमेदवाराला 10 वर्ष कोणतीही सरकारी नोकरीची परीक्षा देता येणार नाही.
  • हा नवा नियम ‘अँटी कॉपींग लॉ’ म्हणून ओळखला जाईल.
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुस्कर सिंग धामी यांनी या नव्या नियमाबाबत माहिती दिली.

भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात:

  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेच्या माध्यमातून भारताने सुदानच्या अबेई येथे भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची एक संपूर्ण प्लॅटून तैनात केली आहे.
  • या प्लॅटूनला ‘ब्लू हेल्मेट’ असे नाव देण्यात आले आहे.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतरिम सुरक्षा दलाच्या अंतर्गत भारतीय प्लॅटून तेथे कार्यरत असणार आहे.
  • यापूर्वी 2007 साली भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेअंतर्गत लायबेरियामध्ये पूर्णपणे महिला लष्करी अधिकाऱ्यांच्या तुकड्या तैनात केल्या होत्या.
  • आजवर भारताने शांतीसेनेअंतर्गत नेमलेली महिला लष्करी अधिकाऱ्यांची ती सर्वात मोठी तुकडी होती.
  • केवळ महिला अधिकाऱ्यांची तुकडी शांतीसेनेअंतर्गत तैनात करणारा भारत हा त्यावेळेस जगातील पहिलाच देश ठरला होता.
  • सध्या सुदानमधील अबेई येथे तैनात महिला अधिकाऱ्यांच्या ‘ब्लू हेल्मेट’ या प्लॅटूनमध्ये दोन वरिष्ठ महिला अधिकारी तर इतर विविध श्रेणींच्या 25 भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महिला ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क व्हायकॉम 18 कडे:

  • महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या पहिल्या पाच हंगामांसाठीचे प्रसारण हक्क रिलायन्सच्या मालकीच्या व्हायकॉम 18ने प्राप्त केले आहेत.
  • त्यासाठी त्यांनी तब्बल 951 कोटी रुपयांची विजयी बोली लावल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले.
  • महिला ‘आयपीएल’च्या सामन्यांचे प्रसारण हक्क प्राप्त करताना व्हायकॉम 18 ने डिझ्नी-स्टार आणि सोनी यांना मागे टाकले.
  • महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या पर्वाला मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होण्याची शक्यता असून या स्पर्धेत पाच संघांचा सहभाग असेल.

दिनविशेष:

  • सन 1773 मध्ये ‘कॅप्टन जेम्स कुक’ यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
  • रॉबर्ट फाल्कन स्कॉट हे सन 1912 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहचले होते.
  • भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म 17 जानेवारी 1906 मध्ये झाला होता.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक सन 1946 मध्ये झाली.
  • सन 1956 मध्ये बेळगाव-कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली होती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.