17 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
17 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2020)
उत्तराखंडमधील पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत:
उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.
आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.
1971 मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी 38 ठिकाणे आहेत.
दक्षिण आशियात भारताची एकूण 38 पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.
जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र 20 कोटी हेक्टरचे आहे.
भारताच्या 10 पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता.
इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील करोना उपचारात वापरण्यात आलेल्या रेमडेसिवीरसह चार औषधे कोविड 19 उपचारात गुणकारी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.
त्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, लोपिनावीर/ रिटोनावीर तसेच इंटरफेरॉन या औषधांचाही समावेश आहे.
भारतात अजूनही रेमडेसिवीर हे प्रभावी औषध मानले जात असून त्याचा वापर उपचारात मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे.
इबोलावरचे रेमडेसिवीर हे औषध कोविड 19वर वापरण्यात येत होते त्याला अमेरिकेतही मान्यता मिळाली.
श्रीकांतला दुसऱ्या मानांकित चाओ चेनकडून 22-20, 13-21, 16-21 अशी हार पत्करावी लागली.
श्रीकांतच्या पराभवासोबत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सात महिन्यानंतर या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनला प्रारंभ झाला होता.
तसेच या वर्षांतील ही अखेरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होती. 2017 मध्ये डेन्मार्क स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतवरच भारताच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या.
श्रीकांतने त्याप्रमाणे चेनविरुद्ध चुरशीचा रंगलेला पहिला गेम जिंकला. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये पाचवा मानांकित श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला.
दिनविशेष :
17 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.