17 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

17 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2021)

अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यांची नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा :

  • सामायिक हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि संरक्षणविषयक क्षमतांचे अधिक आदानप्रदान करण्याची मुभा देण्यासाठी भारत- प्रशांत क्षेत्रासाठी एका नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया यांनी केली आहे.
  • तर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत असतानाच, ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
  • तिन्ही देशांच्या आद्याक्षरांचा समावेश असलेली आणि ‘महत्त्वाची’ असे वर्णन करण्यात आलेल्या ‘एयूकेयूएस’ या नव्या आघाडीचे उद्घाटन दूरचित्रवाणीवरील संयुक्त भाषणासह आभासी पद्धतीने बुधवारी करण्यात आले.
  • तसेच या आघाडीअंतर्गत, संयुक्त क्षमतांचा विकास व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच सुरक्षा आणि संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक तळ आणि पुरवठा साखळ्या यांचे अधिक सखोल एकीकरण करण्याचे तिन्ही देशांनी मान्य केले आहे.
  • ‘ऑकस’चा पहिला मोठा उपक्रम म्हणून, ऑस्ट्रेलिया अमेरिका व ब्रिटनच्या मदतीने अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्यांचा एक ताफा बांधणार आहे.
  • तर भारत- पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही क्षमतावाढ करण्यात येत आहे.

विश्वचषकानंतर विराट टी-20 कर्णधारपद सोडणार :

  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले.
  • परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
  • 2017 मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह धोनीकडून स्वीकारली.
  • तसेच यानंतरच्या 67 सामन्यांपैकी 45 सामन्यांतच विराटला खेळवले गेले.
  • माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-20 संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली.

उत्तर कोरियाने ट्रेनमधून केली क्षेपणास्त्र चाचणी :

  • उत्तर कोरियाने प्रथमच रेल्वेवर बांधलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीसह बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यावर चिंता व्यक्त केली आहे.
  • तर दुसरीकडे चाचणी यशस्वी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे.
  • तसेच या क्षेपणास्त्राची 800 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. उत्तर कोरियाने एका समुद्री भागाला लक्ष्य केलं होतं.
  • क्षेपणास्त्राचा उद्देश रेल्वे आधारित क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी घेण्याचा होता, असं उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितलं आहे. यातून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्याचा हेतू नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
  • दक्षिण कोरियाने बुधवारी सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. अण्वस्त्रांशिवाय ही प्रणाली विकसित करणारा पहिला देश आहे.
  • तर त्यामुळे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात शस्त्रास्त्र स्पर्धा वेगाने वाढत आहे. दोन्ही देश नवीन शस्त्रास्त्रांची तसेच उच्च क्षमतेच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेत आहेत.
  • उत्तर कोरियाने रविवारीही लांब पल्ल्याच्या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.

चीन सरकारनं घेतला मोठा निर्णय :

  • चीन बदलत्या लोकसंख्याशास्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहे. चीनची एक मोठी चिंता म्हणजे देशात तरुणांची घटती संख्या आहे.
  • तर यासाठी त्यांनी मे महिन्यात आपल्या धोरणात मोठा बदल केला. या बदललेल्या धोरणाअंतर्गत चीनमधील जोडप्यांवर आता तीन मुलांना जन्म देण्यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे.
  • तसेच या धोरणांतर्गत, चीनच्या स्थानिक सरकारने तिसरे अपत्य असलेल्या जोडप्यांना रोख रक्कम तसेच इतर सुविधा देणे सुरू केले आहे.
  • चीनच्या गांसु प्रांतातील लिंजे काउंटीने तीन मुलं असलेल्या जोडप्यांसाठी राज्याचा खजिना उघडला आहे.
  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, येथे जोडप्याचे तिसरे अपत्य जन्माला येताच त्यांना एकहाती 5,000 युआन दिले जात आहे.

धोनी ‘राष्ट्रीय छात्र सेना’साठी सूचना करणार :

  • ‘राष्ट्रीय छात्र सेना’ म्हणजे ‘एनसीसी’मध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी, या युवा शक्तीचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग व्हावा यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी संरक्षण विभागाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
  • तसेच 14 सदस्यांची समिती असून या समितीचे अध्यक्ष माजी खासदार बैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
  • विशेष म्हणजे क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
  • तर महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे अशा प्रमुख सदस्यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.
  • देशांत ज्युनियर ( शालेय स्तर ) आणि सिनियर ( महाविद्यालय ) अशा दोन स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
  • सामाजिक आणि नागरी कर्तव्ये याची जाणीव राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थांना विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून करुन दिली जाते.
  • याचबरोबर विद्यार्थ्यांना भविष्यात सैन्य दलांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देत सैन्य दलाची तोंड ओळख करुन दिली जाते.

स्टेट बँकेच्या ग्राहकांना उत्सवांच्या निमित्ताने एक खास ऑफर :

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी एक खास भेट दिली आहे.
  • तर सणांच्या काळात गृहकर्ज अधिक किफायतशीर करणं हा या ऑफर मागचा मुख्य उद्देश आहे. या ऑफरनुसार, स्टेट बँक आपल्या ग्राहकांना फक्त 6.70 टक्के व्याजदराने गृहकर्ज देणार आहे.
  • तसेच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा असणार नाही. स्टेट बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, एसबीआय सध्या 7.15 टक्के व्याज दराने 75 लाखांहून अधिक गृहकर्ज देतं.
  • पण उत्सवांच्या ऑफर्स सुरू झाल्यानंतर 75 लाख रुपयांपेक्षा जास्त गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदारांना किमान 6.7% दराने गृहकर्ज मिळेल.
  • भारतीय स्टेट बँकेने प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केलं आहे. कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित सवलतीच्या दराने आकर्षक व्याज देईल.

दिनविशेष :

  • 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
  • महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
  • सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago