भारतीय नौदल आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली – लोंगेवाल – दिल्ली या मार्गावर 12 दिवसांच्या ऑल इंडिया विमेन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
नौदलाच्या ताफ्यातील साहसी महिलांद्वारा या रॅलीचे संचालन होत आहे.
भारतीय नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी अनेक अकल्पित आव्हानांना धैर्याने, दृढ निश्चय – संयमाने सामोऱ्या जाणाऱ्या महिलांच्या शौर्यगाथा ठळकपणे मांडण्यात येणार आहेत.
भारतीय नौदल आणि जीप इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजिण्यात आली आहे.
दिल्लीपासून सुरू होत जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपुर, उदयपूर असा सुमारे 2300 किमीचा प्रवास करत या रॅलीचा समारोप दिल्लीमधे होईल.
शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे:
राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला.
आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले.
त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते.
मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
तसेच शिवसेनेच्या 2018च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.
पुजारा 100वी कसोटी खेळणारा 13वा भारतीय क्रिकेटपटू:
भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रवेश करताच मोठी कामगिरी करेल.
2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 13वा क्रिकेटपटू ठरणार आहे.
आपल्या 13 वर्षाच्या कारकिर्दीत तो भारताचा एक प्रमुख फलंदाज म्हणून समोर आला.
चेतेश्वर पुजाराने भारतासाठी 99 सामन्यात 7021 धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली. नाबाद 206 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
दिनविशेष:
पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला.
स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये झाला होता.
क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1883 मध्ये झाला.
1979 या वर्षी सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
सन 1998 मध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.