18 July 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 जुलै 2019)
चुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड :
- सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे.
- सरकार लवकरच ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.
- इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती.
- तर त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
- ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम एक सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
हिमाची आणखी एक सुवर्ण कामगिरी :
- भारतीय वेगवान धावपटू हिमा दासची दमदार कामगिरी सुरूच आहे. सलग 15 दिवसांच्या आत हिमाने धावण्याच्या
- विविध स्पर्धांमध्ये चौथे सुवर्णपदक जिंकत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
- झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर हिमा दास ने हा पराक्रम केला आहे.
- तसेच पुरुषांच्या 400 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने आपले दुसरे सुवर्ण पदक मिळवले आहे.
- हिमा ने केवळ 23.25 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याआधी 19 वर्षांच्या हिमाने 2,6 आणि 14 जुलै रोजीही तीन सुवर्णपदक जिंकले होते.
चांद्रयान-2चे प्रक्षेपण 21 किंवा 22 जुलै रोजी :
- चांद्रयान-2 या अवकाशयानाचे 21 जुलै रोजी दुपारी किंवा 22 जुलै पहाटे पुनर्प्रक्षेपण करण्याचा विचार भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) करत आहे.
- जीएसएलव्ही मार्क 3 या प्रक्षेपकाच्या मदतीने गेल्या सोमवारी पहाटे झेपावणाऱ्या चांद्रयान2 चे उड्डाण आयत्या वेळी उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले होते.
- श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. त्यानंतर, ते चंद्राच्या दिशेने रवाना होईल.
- चांद्रयान-2चे या आधी प्रक्षेपण करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यावेळी निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी इस्रोचे अभियंते व शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.
दिनविशेष :
- 18 जुलै हा ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन‘ म्हणून पाळला जातो.
- मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये झाला.
- सन 1968 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना झाली.
- अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला.
- उद्योगपती गोदरेज यांना सन 1996 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा