18 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
भारतीय लष्कर
18 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 मार्च 2020)
भारतीय लष्कराने घेतला हा मोठा निर्णय :
करोना व्हायरसची दहशत वाढते आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहेत. भारतीय लष्करही त्यात मागे नाही.
भारतीय लष्करानेही विविध 90 प्रकारच्या कोर्सेसना स्थगिती दिली आहे. लष्कराशी संबंधित प्रशिक्षण देणारे हे कोर्सेस आहेत. ज्यांना स्थगिती देण्यात आली आहे. लष्कराने हा मोठा निर्णय घेतला आहे.
तर या कोर्समध्ये जास्तीत जास्त जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र करोनाची दहशत लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे 90 प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत.
तर 16 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत 90 कोर्सेस घेतले जाणार होते. या कोर्सेसमध्ये 6 हजार लोकांचा समावेश होता. या सहा हजार लोकांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून हे कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत.
सीबीआयच्या प्रवक्तेपदावर छाप उमटवणारे मराठी अधिकारी नितीन वाकणकर यांची ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशनच्या (डीएव्हीपी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयच्या प्रतिमेचा नकारात्मक प्रसार रोखण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
तर सीबीआय संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी सल्लामसलत करून वाकणकर यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सीबीआयची प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केले.
भारतीय माहिती सेवेत असताना वाकणकर यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही माध्यम सचिव होते. दिवंगत माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मंत्रालयातही त्यांनी माहिती व प्रचार विभागाची धुरा सांभाळली होती.
लष्कराच्या पाठोपाठ नौदल या देशाच्या दुसऱ्या सशस्त्र सैन्य दलातील ‘पर्मनंट कमिशन’चे दरवाजेही सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुले केले.
तर महिलांची नौदलात भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकार लिंगभेद करून महिलांना ‘पर्मनंट कमिशन’च्या हक्कापासून वंचित करू शकत नाही, असे न्यायालयाने जाहीर केले, अशा प्रकारे एका महिन्यात दिलेल्या दोन निकालांनी न्यायालयाने लष्कर व नौदल या दोन सैन्यदलांमध्ये महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने देशाचे संरक्षण करण्यास समर्थ ठरविले आहे.
तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या सन 2015 मधील निकालाविरुद्ध भारत सरकारने केलेले अपील फेटाळताना न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला.
दिनविशेष:
शहाजी राजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता.
18 मार्च 1867 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला होता.
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म 18 मार्च 1881 रोजी झाला.
सन 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरूंगवास झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन सन 1944 मध्ये भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.