18 October 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2022)
भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांची नियुक्ती :
भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.
तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती.
न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.
हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या 39 व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली.
हिंदी भाषेमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पाठय़पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले.
अन्य आठ भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण देण्यावर काम सुरू असल्याचेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेश सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला असून स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
मेडिकल बायोकेमिस्ट्री, अॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिऑलॉजी या तीन विषयांच्या हिंदीतील पुस्तकांचे शाह यांनी प्रकाशन केले.
पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत.
टी20 विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल जाहीर :
आयसीसीने टी20 विश्वचषकात सहभागी समालोचकांची यादी जाहीर केली आहे.
समालोचकांची या यादीमध्ये भारताच्या हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
याशिवाय नुकतेच निवृत्त झालेले इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉमसेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यांसारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील.
टी20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत.
या स्पर्धेसाठी नामांकित 29 समालोचकांच्या गटात मेल जोन्स, इसा गुहा आणि नताली जर्मनोस महिला समालोचक म्हणून उपस्थित आहेत.
दिनविशेष :
18 ऑक्टोबर – जागतिक रजोनिवृत्ती दिन
18 ऑक्टोबर 1867 मध्ये सोविएत रशियाला 72 लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
थिऑसॉफिकल सोसायटीची18 ऑक्टोबर 1879 मध्ये स्थापना झाली.
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
18 ऑक्टोबर 1922 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची18 ऑक्टोबर 1954 मध्ये घोषणा केली.
18 ऑक्टोबर 1967 मध्ये सोविएत रशियाचे व्हेनेरा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
2 years ago
Dhanshri Patil
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.