18 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 September 2018 Current Affairs In Marathi

18 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 सप्टेंबर 2018)

राज्यात आयुष्मान भारत 23 सप्टेंबरपासून:

  • राज्यातील सुमारे 84 लाख कुटुंबाच्या पाच लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची हमी घेणाऱ्या ‘आयुष्मान भारत योजने’बरोबरच गेली सहा वर्षे दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना मोफत वैद्यकीय सुविधा देणारी राज्य सरकारची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ही सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात येत्या 23 सप्टेंबरपासून आयुष्मान भारत योजना सुरू होणार आहे. Ayushyaman Bharat
  • या योजनेमुळे राज्याच्या जनआरोग्य योजनेचे काय होणार, असा प्रश्न होता. कारण या योजनेत सुमारे दोन कोटी कुटुंबांना विम्याचे छत्र मिळते. त्या तुलनेत आयुष्मान योजनेत कमी कुटुंबे सामावली जाणार आहेत.
  • राज्यातील सुमारे 84 लाख कुटुंबाना या योजनेचा फायदा होणार असून पहिल्या टप्प्यांमध्ये राज्य सरकार आणि पालिकाअंतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांअंतर्गत ही योजना सुरू केली जाईल.
  • केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी अशा आयुष्मान भारत योजनेसाठी 23 राज्यांनी संमती दर्शविली असून 23 सप्टेंबर रोजी रांची येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात येईल.

तीन मोठ्या बँकेचे एसबीआयमध्ये होणार विलीनीकरण:

  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर आता मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील आणखी काही बँकांच्या विलीनीकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
  • विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनीही विलीनीकरणाची माहिती माध्यमांना दिली.
  • अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक बँकांचे विलीनीकरणाचे करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यादृष्टीने सरकारने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
  • विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नसल्याची ग्वाही देत पूर्वीच्या सर्व सेवा व अटी त्यांना लागू केले जातील, असे जेटली यांनी सांगितले.
  • सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी असलेला रेटा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकिंग क्षेत्राच्या अमूल्य योगदानाची अपेक्षा या पार्श्वभूमीवर ही विलीनीकरणाची घोषणा महत्त्वाची मानण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी आता ‘डीटीएच’चा उपयोग:

  • पहिली, आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाचा (एमएससीईआरटी) ‘व्हर्च्युअल‘ प्रशिक्षणाच्या फंड्यानंतर ‘डायरेक्‍ट टू होम-टेलिव्हीजन‘वरून (डीटीएच) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ‘व्हिडिओ क्‍लीप्स‘ही तयार केल्या आहेत.
  • दर वर्षी अभ्यासक्रमातील बदलासाठी एमएससीईआरटी प्रशिक्षणाचे आयोजन करते. मात्र, या वर्षी बराच उशीर झाला असून, पुस्तकांमध्ये चुका आढळून आल्याने प्राधिकरणाला प्रशिक्षण घेणे अशक्‍य झाले. त्यामुळे अद्यापही शिक्षकांना आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम कसा शिकवावा, याबद्दल प्रश्‍न पडला आहे.
  • प्रशिक्षणामध्ये बराच वेळ जाणार असल्याचे निदर्शनास येताच पहिली, आठवी आणि दहावीच्या शिक्षकांना ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी स्तरावर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’व्दारे सूचना देण्यात आल्यात. मात्र, सर्वसाधारण प्रशिक्षणात प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आपल्या संकल्पना व पडणाऱ्या प्रश्‍नांची उकल करून घेत होते.
  • व्हर्च्युअल‘ प्रशिक्षण एकतर्फी असल्याने त्याचा फायदा झाला नसल्याचे समजते. राज्यात 63 हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांमध्ये ॲपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • तसेच 24 ते 28 सप्टेंबरदरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटांपूर्वी शिक्षकांना कळविण्यात येईल. यासाठी शाळेला डीटीएच, माईक आणि इंटर्व्हटरची सुविधा करावी लागणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत घेण्याचे आवाहन एमएससीईआरटीकडून करण्यात आले आहे.

टाईम मासिकाची विक्री 19 कोटी डॉलरमध्ये:

  • जगप्रसिद्धटाइममासिक विक्री करण्यात आली आहे. ‘मेरेडिथ कॉर्प‘ या अमेरिकी कंपनीनेसेल्सफोर्सकंपनीलाटाइममासिक 19 कोटी डॉलरमध्ये विकले आहे.
  • भारतीय चलनानुसार ही रक्कम 1368 कोटी रुपये एवढी मोठी आहे. ‘सेल्सफोर्स‘चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता ‘टाइममासिकाचे नवे मालक असणार आहेत.
  • ‘सेल्सफोर्स’च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतले आहे. सेल्सफोर्स ही ‘क्लाउड कंप्यूटिंग’ मधील दिग्गज कंपनी आहे. Times
  • 190 मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचे ‘मेरेडिथ’कडून सांगण्यात आले आहे. मात्र, पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइम्सचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असंही ‘मेरेडिथ’ने स्पष्ट केले आहे. याबाबत, पुढील 30 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. टाईम मॅगझीनचा जगभरात प्रचंड खप आहे.
  • 1923 मध्ये हेन्री लूस यांनी हे मॅगझीन सुरु केले होते. टाईम मॅगझीनला जानेवारी 2018 मध्ये मेरेडिथ ग्रुपने खरेदी केले होते. मात्र, मेरेडिथने हे मॅगझीन सेल्सफोर्सचे सह-संस्थापक मार्क बेनिओफ (53) आणि त्यांची पत्नी लायनी बेनिओफ यांनी विकत घेतली आहे. बेनिओफ यांची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर एवढी आहे.

लोकप्रिय वेदनाशामक ‘सारिडॉन’ वरील बंदी हटली:

  • बंदी घातलेल्यासारिडॉन‘सह आणखी तीन ‘फिक्स्ड डोज काँबिनेशन्स‘ना (एफडीसी) सर्वोच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर रोजी विक्रीची परवानगी दिल्यामुळे, हे लोकप्रिय वेदनाशामक आता देशभरातील औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • काही औषधनिर्माते आणि औषधविक्रेत्यांच्या संघटना यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीस जारी करून त्यांना उत्तर सादर करण्यास सांगितले.
  • पिरामल हेल्थकेअरचे ‘सारिडॉन’, ग्लॅक्सो स्मिथक्लाईनचे ‘पिरिटॉन’ आणि जुगाट फार्माचे ‘डार्ट’ यांच्यासह आणखी एका औषधाच्या विक्रीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. चौथ्या औषधाची माहिती मिळू शकली नाही.
  • तथापि, आरोग्य मंत्रालयाने 7 सप्टेंबरच्या अधिसूचनेव्दारे बंदी घातलेल्या 328 एफडीसी औषधांच्या यादीत असलेल्या इतर औषधांच्या बाबतीत कुठलाही दिलासा दिला नाही. एफडीसी म्हणजे दोन किंवा अधिक औषधे एका ठरावीक प्रमाणात एका सिंगल डोजच्या स्वरूपात असलेले औषध होय.
  • आरोग्य मंत्रालयाने 10 मार्च 2016च्या एका अधिसूचनेव्दारे, एफडीसींचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांना बंदी घातली होती. याला फार्मा कंपन्यांनी आधी दिल्ली उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दिनविशेष:

  • सन 1882 मध्ये पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली.
  • महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना 18 सप्टेंबर सन 1927 मध्ये करण्यात आली.
  • सन 1947 मध्ये अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए. (CIA) ची स्थापना करण्यात आली.
  • निझामाच्या सैन्याने सन 1948 मध्ये पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.
  • अमेरिकन सायक्लिस्ट लान्स आर्मस्ट्राँग यांचा जन्म 18 सप्टेंबर 1971 मध्ये झाला.
  • सन 1997 मध्ये महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.