1857 च्या उठावानंतरचा काळ
1857 च्या उठावानंतरचा काळ
- भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
- राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
- इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
- इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
- 1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
- इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
- ‘चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
- इ.स. 1859 साली शेतकर्याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
- इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
- लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
- इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.
- व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
- 14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
- लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.