19 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2018)
केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून 20 कोटींची मदत :
- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
- तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
- तर समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
- केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
जीमेलचे नवे फीचर ठरावीक काळानंतर आपोआप मेल डिलीट:
- अनावश्यक मेलमुळे भ्रमणध्वनीची मेमरी फूल होण्याचा प्रकार आणि ती डिलीट करण्यात वाया जाणारा वेळ यापासून आपली सुटका होणार आहे.
- यासाठी जीमेलने एक नवे फीचर आणले असून त्यामुळे तुम्ही एखाद्याला पाठवत असलेला मेल ठरावीक कालावधीनंतर आपोआर डिलीट होणार आहे.
- त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठविलेले खासगी मेल फॉरवर्ड किंवा कॉपी करता येणार नाहीत.
- ‘कॉन्फिडेन्शल मोड’ असे या फीचरचे नाव असून ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवत आहात त्यांच्या मेल बॉक्समध्ये तो मेल किती दिवस ठेवायचा आहे याचा निर्णय तुम्हाला घेता येणार आहे. मेल कम्पोझ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर
कॉन्फिडेन्शलचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून मेल कधी डिलीट करावयाचा त्याची तारीख निश्चित करावयाची आहे. - तर तुम्ही सेट केलेल्या तारखेला त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समधील मेल डिलीट होईल.
- तसेच जीमेलचे हे नवे फीचर अॅण्ड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अॅपवरदेखील उपलब्ध आहे.
संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन :
- संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे.
- 1962 ते 1974 आणि 1974 ते 2006 इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते.
- तर कोफी अन्नान यांना 2001 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
- 1962 मध्ये कोफी अन्नान यांनी WHO या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले.
- तर 1965 ते 1972 या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते.
पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी घेतली शपथ :
- पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी शपथ घेतली.
- तर या सोहळ्याला भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची हजेरी होती.
- इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली आहे.
- तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झालीआहे.
एड्सचा ‘हेल्पलाइन क्रमांक 1097 टोल पावतीवर :
- पोलीस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स, आपत्ती व्यवस्थापन यावेळी नागरिकांच्या मदतीसाठीचे अनुक्रमे 100, 101, 102, 108 हे शासनाचे हेल्पलाइन क्रमांक नागरिकांच्या चांगलेच परिचित आहेत़.
- तर एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेली 1097 ही हेल्पलाइन बहुतांशी नागरिकांना अद्याप माहिती नाही़.
- तर एड्ससाठी जोखीमग्रस्त घटक असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सना या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती व्हावी यासाठी टोलनाक्यावरील पावतीवर हा हेल्पलाइन क्रमांक असलेली पावती दिली जात आहे़
दिनविशेष :
- 19 ऑगस्ट 1856 मध्ये गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
- अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून 16 ऑगस्ट 1999 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- 19 ऑगस्ट 1945 मध्ये होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
- स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा