19 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
19 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 डिसेंबर 2019)
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या मुद्द्यावर बुधवारी तब्बल 10 तास चर्चा करण्यात आली.
230 विरूद्ध 197 मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधातील दुसरा प्रस्तावही सभागृहात मंजुर करण्यात आला.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातच सीनेटमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सीनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार :
समकालीन मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
मराठीसह 23 भाषांतील साहित्य पुरस्कारांची बुधवारी अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी घोषणा केली. एक लाख रुपयांच्या या पुरस्काराचे 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे.
ऑफ डार्कनेस’ (कथेतर गद्य) पुस्तकाचीही साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कोंकणीमध्ये नीलबा खांडेकर यांच्या ‘द वर्ड्स’ या कवितासंग्रहालाही पुरस्काराने नावाजण्यात आले.
तर सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना 2019चा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
मराठी साहित्यासाठी आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत हे तिघे परीक्षक होते. नेपाळी भाषेतील पुरस्कार जाहीर झालेला नाही.
सायरस मिस्त्री पुन्हा होणार अध्यक्ष :
नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देत टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता असं नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने म्हटलं आहे.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये (एनसीएलटी) केस हारल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी निर्णय़ाविरोधात एनसीएलएटीकडे धाव घेतली होती. एनसीएलएटीने जुलै महिन्यात निर्णय सुरक्षित ठेवला होता. आज नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने निर्णय जाहीर करत टाटा समूहाला धक्का दिला आहे.
तर सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली होती. टाटा समूहाकडून एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करणं बेकायदा असल्याचं नॅशनल कंपनी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलने निर्णयात म्हटलं आहे.
तीन बॅचमेट्सच्या हाती असेल देशाची सुरक्षा :
केबी, छोटू आणि मनोज यांनी 1976 मध्ये नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना जराही कल्पना नसेल की एक असाही दिवस येईल जेव्हा आपण तिघंही देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असू. या तिघांमध्ये त्यावेळी एक समानता होती की त्या तिघांचेही वडील हवाई दलात सेवा बजावत होते.
तर आज तब्बल 44 वर्षांच्या सेवेनंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, अॅडमिरल करमबीर सिंह आणि एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया हे पुन्हा एकदा तिन्ही दलांचे प्रमुख म्हणून एकत्र येणार आहेत.
तसेच येत्या 31 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनोज नरवणे हे नवे लष्कर प्रमुख म्हणून सूत्र हाती घेणार आहेत. अॅडमिरल करमबीर सिंह यांनी 31 मे रोजी नौदल प्रमुख पदाची सूत्र हाती घेतली होती. तर एअर चीफ मार्शल भदोरिया हे 30 सप्टेंबर रोजी हवाईदलाच्या प्रमुखपदी विराजमान झाले होते.
लेफ्टनंट जनरल नरवणे हे या महिन्याच्या अखेरिस देशाचे 28 वे लष्कर प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, अॅडमिरल करमबीर सिंह आणि एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदोरिया यांनी एनडीएचा 56 वा कोर्स एकत्र केला होता.
रोहित शर्मा ठरला सर्वोत्तम सलामीवीर :
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 387 धावांपर्यंत मजल मारली.
सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली.
तर रोहित शर्माने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या सहाय्याने 159 धावा केल्या.
तसेच या शतकी खेळीदरम्यान रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला माघारी टाकत, आपण सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज असल्याचं दाखवून दिलं आहे. 1998 साली सचिन तेंडुलकरने एका कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती.
दिनविशेष:
19 डिसेंबर हा दिवस ‘गोआ मुक्ती दिन‘ आहे.
भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ‘प्रतिभा पाटील‘ यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
सन 1961 मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
व्ही.एन. खरे यांनी सन 2002 मध्ये भारताचे 33वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.