19 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती

19 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 फेब्रुवारी 2023)

राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा:

  • अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना 16,982 कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
  • शनिवारी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.
  • या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षेतेखाली जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली.

दक्षिण अफ्रिकेतून भारतात आले आणखी 12 चित्ते:

  • ग्वाल्हेर या ठिकाणी 12 आणखी चित्ते पोहचले आहेत.
  • दक्षिण अफ्रिकेतून आणण्यात आलेले हे पाहुणे आता भारतात वास्तव्य करणार आहेत.
  • या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी 17 या विशेष विमानातून भारतातल्या ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे.
  • या 12 चित्त्यांना मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहे.
  • 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.

राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार:

  • महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली.
  • बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
  • भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.
  • राष्ट्रपती भवनाने देशातील 13 राज्यपालांची बदली केली.
  • याआधी रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपालपदही सांभाळले होते.

100व्या कसोटी सामन्यात पुजारावर ओढवली नामुष्की:

  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
  • भारताचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी हा त्याचा 100वा कसोटी सामना आहे.
  • त्यात त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली.
  • 100 कसोटी सामने खेळणारा 13वा भारतीय खेळाडू पुजाराच्या रूपाने भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात 54 धावांवर तिसरा धक्का बसला.

दिनविशेष:

  • 19 फेब्रुवारी हा दिवस ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती‘ म्हणून साजरा केला जातो.
  • सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निकोलस कोपर्निकस‘ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1473 मध्ये झाला होता.
  • 19 फेब्रुवारी 1630 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ यांचा जन्म झाला.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला होता.
  • सन 2003 यावर्षी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.