Current Affairs (चालू घडामोडी)

19 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 जानेवारी 2019)

सैन्य पोलिसांत होणार 20 टक्के महिलांची भरती:

  • आज बदललेल्या काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र लष्करामधील सैनिकी विभागात आतापर्यंत प्रवेश दिला जात नव्हता.
  • पण आता महिलासुद्धा लष्कराच्या सैनिकी विभागात भरती होऊन शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे.
  • महिलांना लष्करामधील वैद्यकीय तसेच इतर काही विभागात प्रवेश दिला जात होता. मात्र प्रत्यक्ष रणांगणाशी संबंधित असलेल्या सैनिकी विभागात आतापर्यंत महिलांना प्रवेश दिला जात नसे. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऐतिहासिक निर्णय घेताना महिलांच्या सैनिकी विभागातील प्रवेशाबाबत असलेला अडथळा दूर केला आहे.
  • तर आता महिलांनाही लष्कराच्या सैनिकी विभागात सामावून घेतले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेंतर्गत 20 टक्के महिलांना सैनिकी विभागात प्रवेश दिला जाईल.

भारतासाठी अमेरिकी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण:

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याबाबत भारतासमवेत चर्चा सुरू केली आहे.
  • भारतासमवेत संरक्षण संबंध बळकट करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे पेण्टागॉनने म्हटले आहे. भारताला चीन आणि पाकिस्तानकडून असलेले आव्हान लक्षात घेता अमेरिकेकडून हे तंत्रज्ञान मिळाले तर ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जी रणनीती आहे त्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. पेण्टागॉनच्या 81 पानांच्या क्षेपणास्त्र संरक्षण आढावा अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
  • अमेरिकेकडून भारताला अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर चीन आणि पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे.
  • भारत पाच अब्ज डॉलर खर्च करून रशियाकडून एस-400 हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकत घेणार होता. भारताच्या या निर्णयावर अमेरिकेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. क्षेपणास्त्र क्षमता आता केवळ जगातील काही भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
  • दक्षिण आशियातील अनेक देश आता अत्याधुनिक आणि विविध टप्प्यांपर्यंत मारक क्षमता असलेली बॅलेस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित करीत आहेत, असे पेण्टागॉनच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा सुवर्ण’पंच’:

  • पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये हरयाणा व मणिपूर यांच्या आव्हानास यशस्वीरीत्या सामोरे जात 17 वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.
  • देविकाने 46 किलो गटात हरयाणाच्या तमन्नावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. मितालीने 66 किलो गटात हरयाणाच्या मुस्कानला 4-1 अशा फरकाने पराभूत केले.
  • मुलांच्या 48 किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोमने मिझोरामच्या जोरामुओनावर 4-1 अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. शेखोम सिंगने 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिसांगाचा पराभव केला. पुण्याच्या आकाश गोरखाला आणि लैश्राम सिंगलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

एका मुस्लिम व्यक्तीने साकारली जगातील सर्वांत उंच दुर्गा मूर्ती:

  • एका मुस्लिम मूर्तिकाराने जगातील सर्वाधिक उंच दुर्गा मातेची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे. नुरुद्दीन अहमद असे त्यांचे नाव असून त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे एका हिंदू देवतेची मूर्ती साकारणाऱ्या या मुस्लिम कलाकाराने ‘कलाकाराला कोणताही धर्म नसतो’ असे सांगत उच्च कोटीचा सामाजिक संदेशही दिला आहे.
  • अहमद हे गुवाहाटीचे काहिलीपाडा भागातील रहिवासी आहेत. त्यांनी गुवाहाटीतील विष्णुपूरमध्ये सप्टेंबर 2017 मध्ये बांबूपासून 98 फूट उंच दुर्गामातेची मूर्ती साकारली होती. त्यावेळी त्यांच्या या कामगिरीची बरीच चर्चा झाली होती.
  • तर यावर बोलताना अहमद म्हणतात, अनेक लोक माझ्या कामाचे कौतुक करतात, मला त्रासही देत नाहीत. मात्र, काही लोक मला जाणीवपूर्वक विचारतात की या कामामध्ये माझा धर्म अडथळा ठरत नाही का? मात्र, मी त्यांना सांगतो की, यात धर्माची बाब येते कुठून. कलाकारांचा कोणताही धर्म नसतो.

दिनविशेष:

  • वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म 19 जानेवारी 1736 रोजी झाला होता.
  • सन 1949 पुणे नगरपालिकाउपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
  • देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम सन 1956 मध्ये जाहीर झाला.
  • सन 1986 मध्ये (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
  • सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प 2007 या वर्षी देशाला अर्पण करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago