19 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

भगवद्गीता

19 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 मार्च 2022)

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर :

  • संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते.
  • वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते.
  • जगभरातल्या एकूण 150 देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं.
  • यंदाच्या वर्षी अर्थात 2022 ची यादी तयार करताना एकूण 146 देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे.
  • या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे 80 आणि 98व्या स्थानावर आहेत.
  • या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे.
  • फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या 9 देशांचा क्रम लागतो.
  • जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे.
  • 146 देशांच्या यादीमध्ये भारत थेट 136व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून 11व्या क्रमांकावर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मार्च 2022)

कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे धडे देण्याचा विचार :

  • मुलांमधील सांस्कृतिक मूल्ये लोप पावत असल्याने ते थांबविण्यासाठी कर्नाटकमधील शाळांत भगवद्गीतेचे पाठ शिकविण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे.
  • शालेय अभ्यासक्रमात नीतिशास्त्र शिकविले जावे, अशी अनेक नागरिकांची मागणी आहे, असे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.
  • विशेष म्हणजे गुजरात सरकारही शाळांमध्ये भगवद्गीता शिकविण्याचे नियोजन करीत आहे.
  • त्यानंतर आता कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी तसे सूतावाच केले.

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धात ऑस्ट्रेलियापुढे भारतीयांचा कस :

  • भारतीय संघाला महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला पुन्हा रुळावर आणायचे असल्यास शनिवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
  • न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.
  • त्यानंतर आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव आहेत.
  • भारताला अजून तीन लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास संघाला कामगिरी उंचवावी लागणार आहे.
  • ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकले आहेत.

एमबीए, एमसीए सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीस झाली सुरूवात :

  • पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या “एमबीए’ आणि “एमसीए’ सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया शुक्रवार पासून सुरू झाली आहे.
  • या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 7 एप्रिलपर्यंत आहे.
  • राज्य सीईटी सेलमार्फत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिेकशन (एमसीए) या दोन्ही अभ्यासक्रमची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते.
  • या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्यांदा सीईटी देणे अनिवार्य आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

दिनविशेष:

  • 19 मार्च सन 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन झाले.
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र सन 1848 मध्ये मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
  • मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म 19 मार्च 1900 मध्ये झाला होता.
  • सन 1931 मध्ये अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
  • 1932 यावर्षी सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 मार्च 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago