19 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
19 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2020)
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
भारताने स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक निशाणा साधला.
ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र 400 किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याला उद्धवस्त करु शकते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमानं आणि जमिनीवरुनही लॉन्च करता येते.
भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ते विकसित करण्यात आलं आहे.
सुरुवातीला याची रेंज 290 किमी होती. त्यानंतर ती वाढवत 400 किमी पेक्षा अधिक करण्यात आली. काही अंदाजांनुसार, सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र 450 किमी पेक्षा अधिक अंतरापर्यंत टार्गेटला उध्वस्त करु शकतो.
स्पुटनिक व्ही’ लशीच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली:
पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारतातील औषध नियंत्रकांनी डॉ. रेड्डी लॅबला ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे.
‘स्पुटनिक व्ही’ रशियन लस आहे. जगात अधिकृत मान्यता देण्यात आलेली ही पहिली लस आहे.
ऑगस्ट महिन्यातच रशियाने मानवी वापरासाठी या लशीला मंजुरी दिली होती.
“वेगवेळया केंद्रांवर आणि रँडम नियंत्रण परीक्षण पद्धतीने ही चाचणी करण्यात येईल.
लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का? आणि रोगप्रतिकारक शक्तीला कितपत चालना मिळते ते, यामध्ये तपासले जाईल” असे डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफच्या संयुक्त निवेदना म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मानेचा रौप्यवेध:
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान हिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
शाहू तुषार मानेने रौप्यपदकाची कमाई केली. बांगलादेश नेमबाजी महासंघातर्फे झालेल्या या स्पर्धेत सहा देशांच्या नेमबाजांनी भाग घेतला होता.
60 वेळा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत इलाव्हेनिल हिने 627.5 गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.
शिओरी हिराटा हिने 622.6 गुणांसह रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या विद्या तोय्यिबा हिने 621.1 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
पुरुषांच्या प्रकारात जपानच्या नाओया ओकाडा याने 630.9 गुणांनिशी सुवर्णपदकावर नाव कोरले. शाहूने 623.8 गुणांसह रौप्यपदक पटकावले.
बांगलादेशच्या बाकी अब्दुल्ला याने 617.3 गुणांसह कांस्यपदक प्राप्त के ले.
इलाव्हेनिल परीक्षेच्या कारणास्तव राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी न झाल्याने या स्पर्धेत खेळू शकली. शाहूला राष्ट्रीय क्रमवारीनुसार या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.
दिनविशेष:
तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी1983 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन.
खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म19 ऑक्टोबर 1910 रोजी झाला.
जर्मनी सन 1933 मध्ये लीग ऑफ नेशन्स (League of Nations)मधून बाहेर पडले.
भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान सन 1970 मध्ये हवाईदलाकडे सुपुर्द.
पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सन 1993 मध्ये सर सी.व्ही. रामन पदक जाहीर.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.